पदवी पाससाठी खुशखबर! IDBI बँकेत तब्बल 600 जागांवर भरती जाहीर

पदवी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

एकूण रिक्त जागा : 600

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (PGDBF)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकात प्राविण्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे असावे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

परीक्षा फी :
IDBI बँकेने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना रु. 1000 जमा करावे लागतील. याशिवाय SC, ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये भरावे लागतील. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येते. यासाठी अधिसूचना वाचणे महत्त्वाचे आहे.
पगार : या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना 4 महिन्यांचे स्टायपेंड दिले जाईल. यानंतर 6.50 लाख CTC म्हणजेच वार्षिक पगार असेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023
परीक्षा (Online): 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा