इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे (इफ्फी) महोत्सवाला २० तारखेपासून पणजी येथे सुरुवात होत आहे. प्रसिद्ध प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान या महोत्सवाचे उद्घाटन करेल; तसेच या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी, अभिनेत्री कतरिना कैफ, शाहिद कपूर हे कलाकार उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले. महोत्सव २८ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, त्यात दोनशेहून अधिक चित्रपट दाखविण्यात येतील. इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाउड्स’ या चित्रपटाद्वारे या महोत्सवाला सुरुवात होईल, तर ‘थिंकिंग ऑफ हिम’ या चित्रपटाद्वारे या महोत्सवाची सांगता होईल.
---Advertisement---
LATEST Post
Published On:
Published On: