इस्रायलच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठा सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारत, इस्रायल शिवाय अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रीस आणि पोलंडच्या वायूसेना सहभागी होणार आहेत. या प्रकल्पाला ब्लू फ्लॅग 2017 हे नाव देण्यात आले आहे. भारतीय वायूसेना पहिल्यांदाच या अभ्यासाचा भाग असणार आहे. यामध्ये भारताकडून सी 130 सुपर हलक्युलस एअरक्राफ्ट 45 जणांच्या शिष्टमंडळासह पाठविण्यात येणार आहे. यामध्ये 15 गरुड कमांडोचाही समावेश आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कॅप्टन मलुक सिंह करताहेत. यामध्ये इस्रायलच्या 25 जेट फायटर आणि एअरक्राफ्टसह 35 युद्ध विमानांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व रेड स्क्वॉड्रन करणार आहे. इस्रायलतर्फे एअर मिसाईल आणि ड्रोन युनिटचाही समावेश असेल. याव्यतरिक्त आठ देशांतून 1000 सैनिक सहभागी होतील. हा अभ्यासदौरा 11 दिवस चालणार आहे. इस्रायलमध्ये तिसऱ्यांदा ब्लू फ्लॅगचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासदौऱ्याची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. भारत, जर्मनी आणि फ्रान्स पहिल्यांदाच यामध्ये सहभागी होत आहे.