⁠  ⁠

10वी उत्तीर्णांसाठी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये भरती, वेतन 81100 पर्यंत मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Indian Military Academy Bharti 2023 इंडियन मिलिटरी अकादमी देहराडून येथे विविध पदांवर होणाऱ्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत.

एकूण रिक्त जागा : 13

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) – 10 जागा
शैक्षणिक पात्रता :
इच्छुक उमेदवाराकडे अवजड नागरी वाहन चालविण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. त्याला अवजड वाहने चालविण्याचा किमान 15 वर्षांचा अनुभव असला पाहिजे. त्याच्याकडे सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असलं पाहिजे.
ऐच्छिक पात्रता – वाहनाची देखभाल किंवा ट्रान्सपोर्ट सुपरवायझरच्या कामाशी संबंधित कोर्स केलेला असल्यास निवड प्रक्रियेत प्रधान्य दिलं जाईल.

2) एमटी ड्रायव्हर (OG) – 03 जागा
शैक्षणिक पात्रता :
इच्छुक उमेदवाराकडे अवजड नागरी वाहन चालविण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. त्याला अवजड वाहने चालवण्याचा किमान 15 वर्षांचा अनुभव असला पाहिजे. त्याच्याकडे सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असलं पाहिजे.
ऐच्छिक पात्रता – वाहनाची देखभाल किंवा ट्रान्सपोर्ट सुपरवायझरच्या कामाशी संबंधित कोर्स केलेला असल्यास निवड प्रक्रियेत प्रधान्य दिलं जाईल. एचएमटीसारखा तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्यास जास्त प्राधान्य मिळेल.

वयोमर्यादा : 56 वर्षे
परीक्षा फी : फी नाही

निवड प्रक्रिया
चाचणी आणि मुलाखतीद्वारे

इतका पगार मिळेल?
एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) – 25,500/- ते 81,100/- दरमहा
एमटी ड्रायव्हर (OG) – 19,900/- ते 63,200/-दरमहा

नोकरी ठिकाण: उत्तराखंड
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कमांडंट, इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून- २४८००७
अधिकृत संकेतस्थळ : indianarmy.nic.in

Application Form : येथे क्लीक करा

Share This Article