१० वी पास उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरीची संधी ; इतका मिळेल पगार

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना भारतीय नौदलात काम करण्याची संधी आहे. नौदलाने एप्रिल २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या बॅचसाठी नाविक म्हणून मॅट्रिक भरती (MR)ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत ३०० जागा भरण्यात येणार आहे. २ नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे.

 एकूण जागा : ३००

पदाचे नाव आणि जागा :

१) शेफ/ Chef
२) स्टुअर्ड/ Steward
३) हाईजिनिस्ट/ Hygienist

शैक्षणिक पात्रता :

भारतीय नौदलाने एप्रिल २०२२ बॅचसाठी जाहीर केलेल्या एमआर नोटिफिकेशन २०२१ नुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक अर्थात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

या रिक्त पदांसाठी निवड प्रक्रियेचा भाग म्हणून साधारण १५०० उमेदवारांना लेखी चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीएफटी) साठी बोलावले जाईल. तसेच लेखी परीक्षेला बसण्यासाठी कट-ऑफ निर्धारित केली जाऊ शकते. ही कट ऑफ प्रत्येक राज्यात वेगळी असू शकते.

वयाची अट : जन्म ०१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००५ दरम्यान.

शारीरिक पात्रता:

उंची – किमान १५७ सेमी
शारीरिक फिटनेस चाचणी (PET) – ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि १० पुश-अप.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते १,५१,००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : २९ ऑक्टोबर २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article