ग्राहक मूल्य निर्देशांक अर्थात किरकोळ महागाई दरात सलग दुस-यांदा वाढ झाली आहे. आॅक्टोबरच्या ३.५८ टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबरचा हा दर ४.८८ टक्के राहिला आहे. दराने १५ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाकडून दर महिन्यातील महागाईचा दर जारी केला जातो. हा दर घाऊक मूल्य व ग्राहक मूल्यानुसार असतो. ग्राहक मूल्याचा दर किरकोळ महागाई दर म्हणून ओळखला जातो. विभागाने मंगळवारी जारी केलेल्या अहवालानुसार, हा दर ४.८८ टक्के आहे. मागीलवर्षी याच महिन्यात हा दर ३.६३ टक्के होता. नोव्हेंबर २०१७ मध्ये ग्रामीण भागात हा दर ४.७९ टक्के तर शहरी भागात ४.९० टक्के राहिला आहे.