एखादा कर्तबगार अधिकारी जनहितासाठी काही धडक निर्णय घेतो त्यावेळी ते निर्णय हितसंबंधी किंवा वरिष्ठांच्या हिताचेच असतात असे नाही. अशा वेळी काय होतं याचे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. मात्र एक सनदी अधिकारी असा आहे ज्याला हितसंबंधाविषयी काहीही घेणं-देणं नसतं. ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतात. म्हणूनच त्यांना 12 वर्षांच्या सेवाकाळात 9 वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागला. अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे व प्रामाणिक सनदी अधिकारी तूकाराम मुंडे यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत…
बीड जिल्ह्यात ताडसोना या लहानशा गावात तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला. त्यांनी आणि त्यांच्या बंधूनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. घरच्या संस्कारात तुकाराम मुंढे यांना प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडरपणा शिकण्यास मिळाला.
१. शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2001 मध्ये त्यांनी राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळवले व त्यांना दुस-या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली.
२. ही निवड प्रक्रिया काहीशी वेळखाऊ असल्याने त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.
३. त्यानंतर मे 2005 ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजेल. विशेष म्हणजे ते देशात 20 वे आले होते आणि तेथून त्यांचा हा बेडर प्रवास सुरु झाला.
४. त्यांच्या सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली.
५. 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची CEO म्हणून निवड झाली. त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून 10-12 टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण 1-2 टक्क्यावर आले.
६. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहील्यांदाच CEO ने डाॅक्टरला निलंबित केले होते.
७. 2009 सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते.
८. मे 2010 ला मुंबईला KVIC ला CEO म्हणून बदली झाली. नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली.
९. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी तीन महीन्यात ते करून दाखवून जालनाकरांची तहान भागवली.
१०. 2011-12 साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले. सप्टेंबर 2012 साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात 143 कोटी रूपयांचा महसूल 500 कोटीवर गेला.
११. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापूरातील 282 गाव घेतले. या गावातील कामे त्यांनी फक्त 150 कोटी रूपयांमध्ये केले. यात लोकांचे योगदान 50-60 कोटींचे होते. वर्षाला 400 टँकर लागणार्या सोलापूरात टँकरची संख्या 30-40 वर आली.
१२. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी असताना अवघ्या 21 दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी 3 हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्याचवेळी CM सोडता इतर VIP दर्शन त्यांनी बंद केले.
१३.नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना ‘आयुक्तासोबत चाला’ हा walking चा कार्यक्रम जनतेत चांगलाच गाजला. त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली.
१४. सध्या ते पुणे महानगरपालिकेच्या PMPML चे अध्यक्ष आहेत. महीन्याला PMPML ची 6 लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या 9 लाखांवर गेली.
अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे, प्रामाणिक, बेडर आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास ‘मिशन एमपीएससी’चा सलाम, मुंढे सरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आवडला असल्यास नक्की शेअर करा.
सोर्स – व्हाट्सअॅप
स्पर्धा परीक्षांचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा
फेसबुक पेज : Mission MPSC | टेलिग्राम चॅनल : @MissionMPSC