भारतासह 128 देशांनी युनायटेड नेशन्स जनरल असेंबली (UNGA) मध्ये जेरूसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर करण्याच्या निर्णयाचा विरोध केला.
गुरुवारी यूएनजीएमध्ये रेझोल्युशन आणण्यात आले होते. त्यात जेरूसलेमला इस्रायलची राजधानी समजू नये असे म्हटले होते. 128 देशांनी याचे समर्थन केले. तर 9 देशांनी विरोधात मतदान केले. तर 35 देशांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध धुडकावून लावत 6 डिसेंबरला रात्री उशीरा येरूसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर केले. इस्रायल संपुर्ण येरूसलेम राजधानी असल्याचा दावा करतो. तर पॅलेस्टाईन पूर्व जेरूसलेम त्यांची राजधानी असल्याचे म्हणतात. पूर्व जेरूसलेममध्ये यहुदी, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा तिन्ही धर्मांचे पवित्र स्थळ आहे. याठिकाणी असलेले टेम्पल माऊंट यहुदिंचे सर्वात पवित्र स्थळ आहे तर अल-अक्सा मशिदीला मुस्लीम बांधव पवित्र मानतात.
1948 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमॅन हे पहिल्या महायुद्धाचे नेते होते. त्यांनी इस्रायलला मान्यता दिली होती.1967 मध्ये युद्धानंतर इस्रायलने ईस्ट जेरूसलेमवर ताबा घेतला होता. तर पॅलेस्टाईनही त्याला राजधानी समजतो.