जगभरातल्या अकरा देशांतील विविध पारंपरिक वाद्ये, पारंपरिक खेळ, हस्तकला आदींचा युनेस्काेच्या यादीत समावेश आहे. तीन वर्षांनी एकदा अशा पद्धतीने बारा वर्षांत अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळे भरत असतात. भारतातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यास हजेरी लावत असतात. या उत्सवाची दखल ‘युनेस्को’ ने घेतली आहे. भारताचा कुंभमेळा हा पृथ्वीतलावरचा एक सर्वात मोठा धार्मिक सोहळा असून नाशिकमध्ये २०१५ ला ताे पार पडला.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे यासंदर्भात खा. हेमंत गाेडसे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात अाला. शर्मा यांनी त्यांच्या अखत्यारीत एक समिती नेमून यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे अादेश िदले. केंद्रीय समितीपुढे सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील अावश्यक असणारे ग्रंथ, साहित्य, छायाचित्रे व व्हिडिअाे क्लिप्स, पुरावा म्हणून दाखल करण्यात अाल्या. याच पुराव्यांच्या अाधारे पॅरिस येथील युनेस्काेच्या कार्यालयात केंद्र सरकारने प्रस्ताव दाखल केला. यातूनच १८८ देशांच्या स्पर्धेत सिंहस्थ कुंभमेळ्याला अांतरराष्ट्रीय दर्जा बहाल झाला अाहे.