⁠  ⁠

Maha Forest : महाराष्ट्र वन विभागाच्या भरतीबाबत मोठी अपडेट ; पदभरतीची जाहिरात…

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Maha Forest Bharti 2023 : तुम्हीही महाराष्ट्र वन विभागमध्ये भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. वन विभागातील पद भरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर 30 जानेवारीला निकाल जाहीर करून 5 मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा (Maha Forest Recruitment) निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारी दरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

तसेच वन विभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा (Maha Forest Recruitment) कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात TCS सोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

भरती संदर्भात महत्वाच्या तारखा – (Maha Forest Bharti)

सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर 2022
भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर 2022
जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी 2023
अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी 2023
ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब्रुवारी 2023
आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च 2023
अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत 2023
नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत 2023

Share This Article