⁠
Announcement

तरुणांनो तयारीला लागा ! महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर

MahaForest Bharti 2022 : तुम्हीही महाराष्ट्र वन विभागमध्ये भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या भरतीची जाहिरात २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध केली जाऊ शकते. अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. या भरतीसंदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. MahaForest Bharti

MahaForest Bharti 2022 Updates

भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१/११/२०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याताना यापुढे स्पर्धा परिक्षा टि.सी.एस.- आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक) व आय.बी.पी.एस. (इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करावयाची आहे. तसेच सदर शासन निर्णयान्वये परीक्षा शुल्क, कंपनीशी करावयाचा सामंजस्य करार याबाबतच्या सुधारीत तरतुदी दिलेल्या आहेत.

त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१/११/२०२२ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दती / तरतुदी यांची तपासणी करुन भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणेबाबत शासनाने संदर्भ ३ वरील पत्रान्वये सुचीत केले आहे.

उपरोक्त सुचनांचे अनुषंगाने कळविण्यात येते की, वनविभागातील सरळसेवेने भरती करावयाच्या पदांची यादी यासोबत जोडली आहे. सदर पदांपैकी ज्या संवर्गाची बिंदूनामावली मुख्य वनसंरक्षक (प्रा.) / वनसंरक्षक (प्रा.) किंवा त्यांचे अधिनस्त वनविभाग स्तरावर आहे त्या संवर्गाची भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ४/५/२०२२ व दिनांक २१/११/२०२२ मधील सुचनांचे अनुषंगाने राबविणेकरीता खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम आखून देण्यात येत आहे.

image

गट-क मधील लिपीक-नि-टंकलेखक संवर्गाची भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणार असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया आपले स्तरावर राबविण्यात येवू नये. याबाबत यापूर्वी कळविल्याप्रमाणे मागणीपत्र तात्काळ या कार्यालयास सादर करावे.

पूर्वी पेसा क्षेत्रात वनरक्षकांची १००% पदे ही स्थानिक अनुसूचित जमातीकरीता राखीव होती. मा. राज्यपाल यांचेकडील अधिसूचना दि. २९/८/२०१९ अन्वये पेसा क्षेत्रातील पदे अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येनुसार १००%, ५०% व २५% याप्रमाणे राखीव करण्यात आली आहे. सदर अधिसूचना वनविभागात कशाप्रकारे अंमलात आणावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रातील वनरक्षक पदांबाबत वेगळ्याने सुचना निर्गमित करण्यात येतील. वनरक्षक भरती प्रक्रिया ही महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक २८/८/२०१८ अन्वये ठरवून दिलेल्या कार्यपध्दतीनुसार राबवावयाची आहे. त्यानुसार बिगर पेसा क्षेत्रातील वनरक्षक भरतीकरीता वरीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम राबवून प्रक्रिया पूर्ण करावी. MahaForest Bharti

MahaForest Bharti 2022 : वेळापत्रक पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

दरम्यान 25 मार्च 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वनविभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्प्यात भरण्याचे व उरलेल्या 1000 जागा दुसऱ्या टप्यात सप्टेंबर महिन्यात भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Related Articles

Back to top button