⁠  ⁠

महाराष्ट्राचा भूगोल – जलसिंचन

Rajat Bhole
By Rajat Bhole 4 Min Read
4 Min Read

Maharashtracha Bhugol (Jalsinchan)
Geography of Maharashtra (Irrigation)

जलसंसाधन

 • एखादी प्रदेशातील पाण्याची उपलब्धता ही प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असते.
 • आपल्याला पाणी पावसाचे मिळते व पर्जन्य हा वापरण्यायोग्य पाण्याचा पृथ्वीवरील एकमेव स्त्राोत आहे.
 • पर्जन्य हा पाण्याचा स्त्राोत असला तरी पर्जन्य हे संसाधन नव्हे.
 • पर्जन्याद्वारे मिळणारे पाणी एकत्र आणावे लागते, साठवावे लागते व नंतर ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी पुरवता येते. जल हे पुनर्नवीकरणीय संसाधन आहे.

महाराष्ट्रील जलसंसाधने

 • महाराष्ट्रात पर्जन्याने वितरण समान नाही. पश्‍चिम घाटात 3000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्य मिळतो तर पर्जन्य छायेच्या प्रदेशात तो 450 मिमी पेक्षा कमी आहे.
 • मान्सूनच्या चार महिन्यांतच वर्षभरातील पर्जन्यापैकी 80 टक्के पर्जन्य केंद्रीत झालेला आहे.
 • महाराष्ट्रातील जल संसाधनांचे वर्गीकरण पृष्ठीयजल व भूजल अशा दोन गटात करता येईल.
 • पाणी जे नदीच्या पात्रातून वाहते, सरोवरांमध्ये गोळा होते किंवा जलाशयात साठवले जाते त्याचा समावेश पृष्ठीय जल संसाधनात केला जातो.
 • जे पाणी जमिनीमध्ये मुरते आणि काही खोलीवर साठून राहते त्याचासमावेश भूजल संसाधनात करतात.
 • महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडकात मात्र पाणी पुरण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
 • 10 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंच धरणांचा समावेश मोठ्या धरणात केला जातो.
 • देशातील सर्वात जास्त मोठी धरणे आपल्या राज्यात आहेत.
 • महाराष्ट्रात एकूण 1800 पेक्षा जास्त मोठी धरणे आहेत.
 • राज्यातील भूजलाचा अंदाजित स्थूलसाठा सुमारे 32.96 अब्ज घन मीटर इतका आहे.

जलसिंचन

 • पिकांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज जेव्हा कृत्रिमरित्या पूर्ण केली जाते त्याला जलसिंचन असे म्हणतात.

जलसिंचनाची साधने व टक्केवारी
1 विहीर जलसिंचन – 55.0 %
2 कालवे जलसिंचन – 22.5 %
3 तलाव जलसिंचन – 14.5 %
4 उपसा जलसिंचन – 8.0 %
एकूण – 100 %

१. विहीर साधने

 • हा जलसिंचन प्रकर व्यक्तिगत स्वरुपाचे साधन असून, विहिरीद्वारे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त क्षेत्र जलसिंचित होते.
 • कोकणामध्ये अत्यल्प क्षेत्र विहीर जलसिंचनाखाली आहे.
 • अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक विहीर आहेत.
 • महाराष्ट्रातील एकूण जलसिंचनापैकी विहीर जलसिंचनाचा हिस्सा 55 टक्के इतका आहे.

२. कालवा जलसिंचन

 • महाराष्ट्रातील बहुसंख्य प्रकल्प जलसिंचनासाठी बांधलेले आहेत.
 • राज्यातील 22.5 टक्के क्षेत्र कालव्याने जलसिचित होते.
 • जलसिंचन प्रकल्पातील पश्‍चिम महाराष्ट्र क्षेत्र अनुकूल आहे. कारण सह्याद्रीच्या पूर्व उतारावर उगम पावणार्‍या नद्या पूर्ववाहिन्या असून धरणे बांधण्यासाठी सुयोग्य ठिकाणे आहेत.

३. तलाव जलसिंचन

 • पूर्व महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक तलाव आहेत. या तलावांचा उपयोग जलसिंचनासाठी केला जातो.
 • महाराष्ट्रातील सुमारे 14.5 टक्के क्षेत्र तलावाद्वारे जलसिंचित होते.
 • तुषार जलसिंचन आणि ठिबक जलसिंचन हे पाण्याची बचत करणारे जलसिंचन प्रकार आहेत. साधारणपणे 40 टक्के पाण्याची बचत करणारे हे प्रकार आहेत.
 • ठिबक जलसिंचनाद्वारे पिकाच्या थेट मुळाशी पाणी जात असल्याने पाण्याबरोबर खताची बचत होते. उपलब्ध पाण्याचा अडीचपट क्षेत्रासाठी वापर करता येईल
 • तुषार जलसिंचनद्वारेही पिकांच्या गरजेइतका पाणी पुरवठा करता येतो.

४. उपसा जलसिंचन

 • पाण्याच्या नद्याख तलाव, सरोवर, जलाशय इ. दुय्यम स्त्रोतापासून अधिक उंचावरील क्षेत्राच्या जलसिंचनासाठी ऑईल इंजिन किंवा विजेच्या पंपाद्वारे पाणी उपसले जाते. त्याद्वारे होणार्‍या जलसिंचनास उपसा जलसिंचन म्हणतात.
 • पाण्याचा स्त्रोत हा नदी, तलाव, धरणे असा असला तरी शेतीसाठी थेट पाणी पोहचू शकत नाही. त्यासाठी उपसा जलसिंचन प्रकल्प राबवावा लागतो.
 • महाराष्ट्रातील सुमारे 8 टक्के क्षेत्र उपसा जलसिंचनाद्वारे ओलिताखाली आणलेले आहे.

जलदुर्भिक्ष

 • महाराष्ट्राची शेती पावसावर अवलंबून आहे.
 • सुमारे 17 टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. म्हणजे 83 टक्के क्षेत्र पावसावरच अवलंबून आहे.
 • महाराष्ट्रात अशी अवर्षणप्रवण स्थिती सुमारे 62000 चौ.कि.मी. क्षेत्रात असून अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, उस्मानाबाद, धुळे या जिल्ह्यांमधील काही क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे.

जलसंसाधन संवर्धन

 • पर्जन्य हा महाराष्ट्रातील जलसंसाधनाचा प्रमुख स्त्रोत आहे.
 • मृदा संसाधन
 • मूलत : मृदा अपक्षय झालेले खडक, खनिज पोषकद्रव्ये, कुजणारे जैविक पदार्थ, पाणी, हवा आणि अनेकविध जीव यांचे मिश्रण असते.
 • मृदांना परिपूर्ण परिसंस्था मानले जाते. वनस्पती मृदांचा एक परिसंस्था म्हणून वापर करतात पदार्थ म्हणून नव्हे.
 • प्रदेशाच्या जैवविविधतेत हवामानाच्या खालोखाल मृदांना महत्वाचा घटक मानले जाते.
 • मृदांची निर्मिती अतिशय सावकाश होत असते म्हणूनच मृदा अपुनर्नवीकरणीय संसाधने आहेत.

Share This Article