Monday, April 12, 2021
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा जोतिबा फुले

Mahatma Jyotiba Phule

Tushar Bhambare by Tushar Bhambare
March 15, 2020
in Samaj Sudharak
0
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
ADVERTISEMENT
महात्मा जोतिबा फुले
  • महात्मा जोतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण
  • महात्मा जोतिबा फुलेंचे सामाजिक कार्य
  • महात्मा जोतिबा फुलेंचे साहित्य

महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते.

महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती.  महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या ‘The Right Of Man’ या पुस्तकाचा प्रभाव होता.

महात्मा जोतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले

महात्मा जोतिबा फुलेंचे सामाजिक कार्य

  • ऑगस्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
  • १७ सप्टेंबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली.
  • १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
  • १८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु केली.
  • १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली.
  • १८६३ मध्ये बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली.
  • १८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला.
  • १८६८ मध्ये स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करुन परंपरागत रुढींना धक्का दिला.
  • ‘शेतकऱ्यांचा आसूड‘ या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी समाजाची स्थिती शब्धबद्ध केली.
  • यातच त्यांनी शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे तलाव, विहिरी यासारखे उपाय सुचवले.
  • सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने पुण्यातून दीनबंधू हे वृत्तपत्र १८७७ मध्ये सुरु केले.
  • महात्मा फुलेंनी आप्लया मित्रांच्या सहकार्याने अस्पृश्य लोकांना विद्या शिकवण्याकरिता मंडळ नावाची संस्था स्थापन केली.
  • २४ सष्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
  • १८८० मध्ये महात्मा फुले यांनी कामगाराच्या प्रश्‍नाची वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या माध्यमातून बॉम्बे मिल असोसिअशन या संघटनेची स्थापना केली.
  • इ.स. १८८८ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या (ड्यूक ऑफ कॅनॉट) कार्यक्रमात त्यांनी ‘शेतकऱ्यांचा प्रतिनिधी’ म्हणून पारंपरिक वेशात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले.
  • महात्मा फुले यांनी हंटर कमिशनपुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली. यामुळेच जनतेने त्यांना १८८८ साली महात्मा हि पदवी दिली.

महात्मा जोतिबा फुलेंचे साहित्य

महात्मा फुले यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

महात्मा जोतिबा फुले
नावसाहित्य प्रकारलेखनकाळ
तृतीय रत्‍ननाटकइ.स.१८५५
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडापोवाडाजून, इ.स. १८६९
विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजीपोवाडाजून इ.स. १८६९
ब्राह्मणांचे कसबपुस्तकइ.स.१८६९
गुलामगिरीपुस्तकइ.स.१८७३
सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकतअहवालसप्टेंबर २४ , इ.स. १८७६
पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्टअहवालमार्च २० इ.स. १८७७
पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभनिबंधएप्रिल १२ , इ.स. १८८९
दुष्काळविषयक पत्रकपत्रक२४ मे इ.स. १८७७
हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदननिवेदन१९ ऑक्टोबर इ.स. १८८२
शेतकऱ्याचा असूडपुस्तक१८ जुलै इ.स. १८८३
महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मतनिबंध४ डिसेंबर इ.स. १८८४
मराठी ग्रंथागार सभेस पत्रपत्र११ जून इ.स. १८८५
सत्सार अंक १पुस्तक१३ जून इ.स. १८८५
सत्सार अंक २पुस्तकऑक्टोंबर इ.स. १८८५
इशारापुस्तक१ ऑक्टोंबर इ.स. १८८५
ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबरजाहीर प्रकटन२९ मार्च इ.स.१८८६
मामा परमानंद यांस पत्रपत्र२ जून इ.स. १८८६
सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधीपुस्तकजून इ.स. १८८७
अखंडादी काव्य रचनाकाव्यरचनाइ.स. १८८७
महात्मा फुले यांचे उईलपत्रमृत्युपत्र१० जुलै इ.स. १८८७
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकपुस्तकइ.स. १८९१ (प्रकाशन)

नियमित अपडेट मिळवण्यासाठी ‘मिशन एमपीएससी’ला फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.

samaj-sudharak-information-in-marathi
Tags: Jyotirao Govindrao PhuleMahatama Jyotirao PhuleSamaj Sudharak Information in MarathiSocial Reformers in Marathi
SendShare206Share
Next Post

नवी मुंबई महानगरपालिका मार्फत शिक्षक पदांच्या 47 जागांसाठी भरती

आसाम पोलिस(Assam Police) मध्ये उपनिरीक्षक पदांच्या 490 जागासाठी भरती

balshastri-jambhekar

आचार्य बाळशास्त्री जांभेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
download-free-lokrajya-PDF
MPSC-PSI-STI-ASO-combine-exam-2020

Recent News

  • चालू घडामोडी : १२ एप्रिल २०२१
  • Prasar Bharati प्रसार भारती मध्ये विविध पदांकरिता भरती
  • जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 55 जागांसाठी भरती

Category

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group