MCGM Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 मार्च 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 652
रिक्त पदाचे नाव : परिचारिका / Staff Nurse
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (10+2) उत्तीर्ण झालेला असावा.
2) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (General Nursing & Midwifery) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण केलेला असावा. (3 किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा.)
3) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण अद्ययावत केलेले असावे.
4) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्चस्तर /निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
5) उमेदवार डी. ओ. ई.ए.सी.सी. सोसायटीचे सी.सी.सी. किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तरावरील प्रमाणपत्रे किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम.एस.सी.आय.टी. किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरीता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणे किंवा वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराकडे सदर प्रमाणपत्र नसल्यास त्याने/तिने शासनाने विहित केलेली एम.एस. सी. आय. टी.ची परीक्षा नेमणूकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल..
वयोमर्यादा
1) अर्ज सादर करावयाच्या दिनांकास म्हणजेच दि. 21.03.2023 रोजी खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे पर्यंत व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 ते 43 वर्षे पर्यंत.
2) अगोदरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कायम सेवेत असल्यास उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा नाही.
3) माजी सैनिक व शारिरीकदृष्टया दिव्यांग असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 45 वर्षे पर्यंत शिथिल करण्यात येईल.
4) शासन निर्णयानुसार खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेता उपरोक्त पदांसाठी असलेली विहित वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल.
5) पदवीधर / पदवीकाधारक अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंत वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.
निवडीचे निकष –
अ) एकूण रिक्त पदांपैकी 90% पदे फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांमधून भरण्यासाठी निवडीचे निकष खालीलप्रमाणे:- बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता, अटी व शर्ती धारण करीत असलेल्या उमेवारांमधून त्यांच्या परिचारीका अभ्यासक्रम जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी पदविका (G.N.M.) उत्तीर्ण वर्ष तसेच जनरल नर्सिंग ॲन्ड मिडवायफरी पदविका (G.N.M.) अभ्यासक्रमाच्या (तीन किंवा साडेतीन वर्षाच्या) प्रत्येक वर्षाचे प्राप्त गुण लक्षात घेऊन अंतिम टक्केवारीचे परिगणन करून निवडयादी तयार करण्यात येईल. निवडीच्या निकषानुसार परिगणन करण्यात आलेली अंतिम टक्केवारी गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
ब) एकूण रिक्त पदांपैकी 10% पदे बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून व इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यासाठी निवडीचे निकष खालीलप्रमाणे:-
बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून व इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता, अटी व शर्ती धारण करीत असलेला उमेदवार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच. एस. सी. / 12 वी ) मध्ये प्रथम प्रयत्नात किमान 65% गुण व जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी पदविकेमध्ये किमान 55% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर उमेदवारांची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच. एस. सी. /12 वी) व जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी पदविका (G.N.M.) अभ्यासक्रमाच्या (तीन किंवा साडेतीन वर्षाच्या) प्रत्येक वर्षाच्या प्राप्त गुणांनुसार अंतिम टक्केवारीचे परिगणन करून निवडयादी तयार करण्यात येईल. या दोन्हीमध्ये प्राप्त केलेल्या अंतिम गुणांच्या टक्केवारीच्या सरासरी गुणवत्तेनुसार (by average merit) निवड यादी तयार करण्यात येईल. निवडीच्या निकषानुसार परिगणन करण्यात आलेली अंतिम टक्केवारीची सरासरी गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
उमेदवारांकरीता सूचना
1) उपरोक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि.08/03/2023 ते दि.21/03/2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
2) भरती प्रक्रियेतील सर्व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील.
3) ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण / आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी/ जिल्हा सैनिक बोर्ड / अपंग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविले आहे, अशा उमेदवारांना देखील स्वतंत्ररित्या अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर इत्यादी समांतर आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
4) उमेदवाराने अर्ज संपूर्णत: अचूक भरावा. पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोडसह अचूक असावा. अर्जातील संपूर्ण माहिती पुन्हा तपासून पहावी. उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची छायांकित प्रत पुढल कार्यवाहीसाठी स्वत: जपून ठेवावी.
5) अर्जामध्ये उमेदवाराने पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार/निवेदन करता येणार नाही. अर्ज सादर केल्यानंतर अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिल करण्याबाबतच्या अटी तपासूनच उमेदवारांनी अर्ज भरावा.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.portal.mcgm.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा