Mission PSI 2016
नमस्कार मित्रांनो…
साधारण ९० दिवसांवर येऊन ठेपलेली – म्हणजेच १२ मार्च २०१७ रोजी होणाऱ्या PSI पूर्व या परीक्षेच्या अनुषंगाने लेखमाला लिहित आहे. त्याचीच ही सुरुवात… PSI परीक्षेची अनियमितता, एकंदरीतच ७५० जागा आणि ओपन २८ वय अट (आजच्या घडीला तरी ) यांमुळे पहिल्या दोनच दिवसात चर्चेत आलेल्या या PSI 2016 च्या जाहिरातीमुळे महाराष्ट्रातून रेकॉर्ड ब्रेक उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करतील असे चित्र आहे. त्यामुळे आपण आपल्या अभ्यास पद्धतीत व नियोजनात काय वेगळेपण (स्मार्टनेस) आणतोय यावर बरचसं यश-अपयश अवलंबून असेल. आम्ही “Mission MPSC” च्या माध्यमातून आपणास शक्य तेवढे मार्गदर्शन आणि नियोजनपूर्ण Strategical Study-plan देण्याचा प्रयत्न करतोय. या सोबतच Daily Current Events देण्याचा प्रयत्न असेल.
how to study for psi
७५० पदांसाठी ही परीक्षा आहे म्हणजे साधारण ९००० परीक्षार्थी Mains साठी निवडले जातील. मागील काही वर्षांपासूनचा cutoff लक्षात घेता ५० स्कोर हा Qualifying असेल तर ५५+ Safe Scoreअसू शकेल. हे मात्र एक अंदाज आहेत जे प्रश्नपत्रिकेनुसार बदलू शकतील. आपण ५५+ score हेच ध्येय ठेवून आपल्या अभ्यासाची strategy बनवावी. आम्ही देखील या विषयावर हे अनुमान लक्षात घेऊनच काम करू.
दरम्यान अनेक messges मधून एकच प्रश्न विचारण्यात येतोय १०० दिवसात पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य आहे का…?
– माझ्या मते हो हे शक्य आहे… Provided-
* How Efficiently and Smartly you study?. (स्टडी प्लॅन)
* तुमचा शालेय अभ्यासक्रमचा बेस.
* परीक्षेबाबतचा तुमचा समज. etc…
यातील काही बाबींवर आम्ही बोलत राहू, काही आपण विचार करण्यासारख्या आहेत.
psi 2017 exam
सुरुवातीलाच मी नम्रपणे सांगू इच्छितो आम्ही जी मार्गदर्शनपर लेखमाला लिहितोय ती सर्वानाच उपयोगी ठरेल असे अजिबात शक्य नाही. जे वर्षभरापासून अभ्यास करत आहेत आणि जे अगदीच नवीनच या क्षेत्राचा विचार करत आहेत अशा परीक्षार्थींना कदाचित हे नियोजन लागू होणार नाही. मात्र बहुतांशी विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा हा सर्वसमावेशक अप्रोच आमचा निश्चित असेल. त्याचप्रमाणे कोणतीही स्ट्रॅटेजी किंवा नियोजन सरसकट यशस्वी होईल असेही नसते. तेव्हा वेळेनुसार परिस्तिथीनुसार यात बदल करता यायला हवा याचंच नाव MPSC आहे.
psi 2016 2017 syllabus
एव्हाना आपला फॉर्म भरून झाला असेलच, याबाबत काही अडचण आल्यास – येथे क्लिक करा.
तेव्हा वेळ न घालवता आपण कामाला लागूयात…
त्याच प्रमाणे वय अटीसंबंधीच्या अफवा आणि इतर गोष्टींवर वेळ वाया घालवू नका… हे आपल्याला परवडण्या जोगे नाही.
शुभेच्छा…!
सोबतच आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट्स करून नक्की कळवाव्यात.
(पुढील लेख PSI च्या प्रश्नपत्रिकेतील अंतर्गत Structure आणि Analysis वर असेल. लवकरच )
Jab Jago tab savers
Best of luck boys and girls
important website
good website and important
Namaskar sir,
Sir can you please tell us what is the criteria for permanent tattoo for psi…
,thank you sir