मूडीज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन संस्थेने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. विशेष म्हणजे १३ वर्षांनंतर मूडीजने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. मूडीजने भारताचे क्रेडिट रेटिंग ‘Baa3’ वरुन ‘Baa2’ केले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावरुन टीका केली जात असताना मूडीजने सरकारच्या या दोन्ही निर्णयांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. मूडीजने भारतातील आर्थिक सुधारणा विचारात घेऊन भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली आहे. गेल्या १३ वर्षांमध्ये मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली नव्हती. मात्र २००४ नंतर प्रथमच मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली आहे. मूडीजकडून आतापर्यंत भारताला ‘Baa3’ रेटिंग देण्यात आले होते. २००४ मध्ये भारताला हे रेटिंग देण्यात आले होते. मात्र आता भारताचे रेटिंग ‘Baa2’ करण्यात आले आहे. ‘Baa3’ गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून निच्चांकी दर्जा दाखवणारे रेटिंग आहे. याआधी मूडीजकडून २०१५ मध्ये भारताचे रेटिंग ‘स्थिर’वरुन ‘सकारात्मक’ करण्यात आले होते.
कसे दिले जाते रेटिंग?
रेटिंग देण्याच्या या सिस्टीमची सुरुवात 1909 मध्ये जॉन मुडीने केली होती. त्याचा उद्देश गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये त्याचे क्रेडिट तयार व्हावे यासाठी एक ग्रेड देणे हा होता. एजन्सी ने ग्रेडिंगसाठी 9 सिम्बल तयार केले आहेत. Aaa, Aa, A, Baa, Ba, B, Caa, Ca आणि C अशा कॅटेगरीमध्ये ग्रेडिंग केले जाते. Aa पासून Caa पर्यंत 1,2,3 कॅटेगरीमध्ये रेटिंग दिले जाते. सध्या Moody’s ग्लोबल कॅपिटल मार्केटचा महत्त्वाचा भाग आहे. फायनान्शिअल मार्केटला क्रेडिट रेटिंग, रिसर्च टूल्स आणि अॅनालिसिस त्याद्वारे दिले जाते. Moody’s कॉर्पोरेशन, Moody’s इन्व्हेस्टर्स सर्व्हिसची पॅरेंट कंपनी आहे. ती क्रेडिट रेटिंग आणि रिसर्चचे काम करते. 2016 मध्ये कॉर्पोरेशनचा रेव्हेन्यू 3.6 बिलियन डॉलर (सुमारे 23,321 कोटी) होता. एजन्सीचे काम जगातील 41 देशांत चालते. त्यात सुमारे 11,700 लोक काम करतात.