MPSC : लिपिक-टंकलेखक पदाच्या भरतीसंदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखक पदाच्या भरती संदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केले आहेत. ज्यामुळे विद्याथ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राज्यस्तरावर एकच कटऑफ असेल.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी किंवा इंग्रजी) पदाचा निकाल जाहीर केला. जवळपास चार महिन्यांनंतर निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. निकाल जाहीर करताना आयोगाकडून राज्यस्तरावर एकच कटऑफ लावला आहे. तसेच बारा पटीत ८४ हजार ४०८ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील, असे अपेक्षित होते. मात्र, आयोगाने ९५ हजार ५४७ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र ठरवले आहे. आयोगाने लावलेल्या निकालात पहिल्यांदाच कटऑफ १९ गुणांपर्यंत खाली आणण्यात आला आहे

त्यामुळेच अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापूर्वीचा खुल्या गटासाठीचा कटऑफ चाळीसच्या पुढे होता, असे विद्यार्थ्यांकडून • सांगितले जात आहे. हे तीन निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देणारे ठरले आहेत

हाय कटऑफची होती भीती
गट ब आणि क संवर्गातील ८ हजार १६९ विविध पदांसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्यापैकी लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदांसाठी परीक्षा झाली. लिपिक- टंकलेखक पदासाठी विभाग प्राधिकरणातर्फे हाय कटऑफ लावण्यात येणार होता. एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून, २८० पोटविभाग किंवा प्राधिकरण आहेत. उमेदवार अर्ज करताना या २८० प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व २८० प्राधिकरण विकल्प म्हणून सिलेक्ट करू शकतात. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी लागणारा कटऑफ कमालीचा वाढू शकतो अशी भीती होती.

Share This Article