ऊसतोड कामगाराच्या मुलीची फौजदार पदाला गवसणी ; वाचा तिचा संघर्षमय प्रवास..

Published On: एप्रिल 29, 2024
Follow Us
police

MPSC Success Story : घरची परिस्थिती बेताची असली तरी जिद्द मोठी असली पाहिजे.‌आप्पासाहेब इनकर व त्यांचे कुटुंबांनी बिकट परिस्थितीत देखील मुलींना उच्च शिक्षण दिले. हे सगळ्यांच्या पुढे आदर्श आहे. राधाने देखील परिस्थितीची जाणीव ठेवली आणि मेहनत घेतली. शिरूर तालुक्यातील खोकरमोहा या गावची राधा इनकर ही रहिवासी. आप्पासाहेबांच्या कुटुंबामध्ये चार मुली व एक मुलगा असा परिवार. मोठी मुलगी राणी यांची जेव्हा वनरक्षक म्हणून निवड झाली त्यानिमित्ताने मिळाले. तसे पाहायला गेले तर त्यांच्या थोरल्या मुलीला म्हणजेच राणीला देखील अधिकारी व्हायचे होते.

परंतू परिस्थितीमुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. पण आपल्या लहान बहिणीला अधिकारी बनवायचे हे मोठ्या बहिणीने मनाशी ठरवले व राधा यांना त्यांच्या थोरल्या बहीण राणी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व सगळ्या गोष्टींची मदत केली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राधा या जेव्हा सातवी, नववी आणि अकरावी मध्ये होत्या तेव्हा त्यांच्या आई आजारी पडल्या.या कालावधीमध्ये वडिलांना मदत म्हणून त्यांनी सातारा जिल्ह्यात जाऊन वडिलांसोबत ऊस तोडणीचे काम देखील केले. कष्टाचे फळ त्यांना त्यांची या ऊसतोड कालावधीमध्ये तीन वेळा त्यांना शाळेतून नाव देखील काढावे लागले.

या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पुढे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी केली..राधाला स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी याकरिता बार्टी या संस्थेने सर्व पुस्तके पुरवली. तसेच मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांच्या वडिलांनी राधाच्या शिक्षणाकरिता कर्ज काढले. पण तिला अधिकारी होण्यासाठी संपूर्ण पाठिंबा दिला.तसेच फौजदार साठी आवश्यक मैदानी चाचणीसाठी लागणारे आवश्यक शूज देखील त्यांनी घेऊन दिले.

संपूर्ण कुटुंबाचा आधार आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व कष्ट आणि सातत्य यामुळे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राधा उत्तीर्ण झाली व आता त्यांची फौजदारपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे राधा या शिरूर तालुक्यातील तिसरी पोलीस अधिकारी म्हणून नावारूपाला आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025