MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा :: ०३
रिक्त पदाचे नाव : मुख्य प्रशासकीय अधिकारी / Chief Administrative Officer
शैक्षणिक पात्रता : ०१) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा या विषयात पदवी असणे ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ मार्च २०२३ रोजी १९ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ७१९/- रुपये मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – ४४९/- रुपये
वेतनश्रेणी : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ डिसेंबर २०२२
निवड प्रकिया:-
प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि/अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया शासन पत्र, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक राकावि-२०२१/प्र.क्र. १६६/सेवा-१, दिनांक १८ ऑक्टोबर, २०२२ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील मुख्य प्रशासन अधिकारी, सामान्य राज्य विमा सेवा, गट-अ या संवगांच्या (सेवाप्रवेश नियम) १९८६ तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या कार्यनियमावली/ कार्यपध्दतीनुसार राबविण्यात येईल.
अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणा-या उमेदवाराची क्रमवारी (Ranking) आयोगाच्या दिनांक १२ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा