MPSC Daily Current Affairs 17 January 2018
1) रजनीकांत यांच्या पाठोपाठ कमल हसनही राजकारणात
रजनीकांत यांच्या पाठोपाठ आता अभिनेते कमल हसनदेखील राजकारणात प्रवेश करत आहेत. 21 फेब्रुवारीला कमल हसन आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा करणार आहेत. शिवाय, कमल हसन याच दिवशी आपले मूळगाव रामनाथापुरम येथून राज्यव्यापी दौरादेखील करणार आहे. या दौ-यादरम्यानच आपल्या राजकीय पक्षाची आणि मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा ते करणार आहेत.
2) 2017 मध्ये 1 कोटी परदेशी पयर्टकांनी दिली भारताला भेट
2017 हे वर्ष भारतीय पर्यटन क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे ठरले आहे. या वर्षभरात भारताला 1 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे भारताला 27 अब्ज डॉलर्स इतके उत्पन्नही मिळाले आहे. परदेशी पर्यटकांनी भारतात येण्याचा हा नवा उच्चांक प्रस्थापित झाल्यामुळे या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. 2018मध्येही अशाच प्रकारे मोठ्या संख्येने पर्यटक भारतात येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स म्हणाले, देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटनक्षेत्राचा वाटा 6.88 टक्के इतका असून 2017मधील एकूण रोजगारांमध्ये 12 टक्के रोजगार या क्षेत्रात होते. 2013 साली भारताचा क्रमांक 65 होता तो आता 2017 साली 25 वर गेला.
3) हज यात्रेसाठीची सबसिडी बंद
हज यात्रेसाठी यापुढे सबसिडी मिळणार नाही, अशी माहिती अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंगळवारी दिली. सबसिडी बंद करूनही या वर्षी १.७५ लाख मुस्लीम हज यात्रेला जाणार असल्याचे सांगून ते म्हणाले. हज यात्रेसाठीचे अनुदान कमी करून २०२२ पर्यंत ते पूर्णपणे बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अल्तमास कबीर व न्या. रंजना देसाई यांनी २०१२ साली दिला होता. असे अनुदान राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरोधी आहे. दुसºयाच्या पैशाने हज यात्रा करणे इस्लाममध्ये निषिद्ध मानले जाते, अशी दोन कारणे न्यायालयाने दिली होती. अनुदानाची रक्कम मुस्लिमांच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरावी, असेही न्यायालयाने सुचविले होते. पण त्याआधी २०१० पासून डॉ. मनमोहन सिंग सरकारने तशी पावले टाकण्यास सुरुवात केली होती. सन १९३२ मध्ये ब्रिटिश सरकारने केलेल्या ‘दी पोर्ट हज कमिटीज अॅक्ट’ने हज समिती स्थापन झाली व भारतीय उपखंडातील मुस्लिमांना हज यात्रेसाठी सरकारचे अनुदान सुरू झाले. त्या वेळी यात्रेकरूंना हजला नेण्या-आणण्याची मक्तेदारी मुगल लाइन्स या ब्रिटिश जहाज कंपनीस देण्यात आली.
4) जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा सापडला
लिसोथो येथील एका हिरे व रत्न कंपनीने जगातील सर्वात मोठा पाचव्या क्रमांकाचा हिरा शोधल्याचा दावा सोमवारी केला. या हिर्याची किंमत ४0 मिलिअन डॉलर एवढी असून, दक्षिण आफ्रिकन देशात तो शोधण्यात आला. ९१0 कॅरेटचा हा हिरा अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगण्यात आले. २00६ नंतर अनेक मौल्यवान हिर्यांचा शोध घेतल्याचे जेम डायमंडचे चीफ एक्झिकेटिव्ह क्लिफोर्ड एल्फीक यांनी सांगितले. हिरे आणि रत्नांच्या जाणकार असलेले बेन डेव्हिस यांनी या हिर्याचा शोध अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
5) भारत-इस्रायलमध्ये ९ करार
भारत आणि इस्रायल यांच्यात सोमवारी सायबर सुरक्षा आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित करारासह एकूण ९ करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या या कराराने द्विपक्षीय संबंधांना बळकटी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले. भारत आणि इस्रायल कृषी, तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करणार आहेत. येथे एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी यांनी ही माहिती दिली. तेल व गॅस क्षेत्रातील सहकार्य, चित्रपट सहनिर्मिती आणि हवाई परिवहन या क्षेत्रांतही करार करण्यात आले. दूरगामी संरक्षण व्यूहरचना, दहशतवाद यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
6) रिलायन्सची प. बंगालमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक
प. बंगालमध्ये ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली. राज्यात मोबाईल फोन आणि सेट टॉप बॉक्स उत्पादन प्रकल्प उभारण्याचा कंपनीचा विचार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. बंगाल जागतिक व्यवसाय शिखर परिषदेत अंबानी यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ‘वेस्ट बेंगॉल बेस्ट बेंगॉल’ बनत आहे. ममता दिदीमुळेच आम्ही राज्यात गुंतवणूक करीत आहोत. आम्ही ४,५०० रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही गुंतवणूक आम्ही १५ हजार कोटींपर्यंत वाढवू शकतो. प. बंगालमध्ये पायाभूत क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. आर्थिक कामगिरीच्या बाबतीत कोलकाताने मुंबईलाही मागे टाकल्याचे एका संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.