1) अमेरिकेने पाकिस्तानचे 7 हजार कोटींचे लष्करी साहाय्य रोखले
अमेरिकेने पाकिस्तानचे तब्बल 7,298 कोटींचे लष्करी साहाय्य रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने याच आठवड्यात पाकला दिली जाणारी 1628 कोटी रुपयांची मदत रोखली होती. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत नाही, तोपर्यंत पाकिस्तानला मदत न करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेकिकेच्या गृह विभागाचे प्रवक्ते हीदर न्यूर्ट यांनी स्पष्ट केले आहे की, पाकला अमेरिकतर्फे दिले जाणारे सर्व लष्करी साहाय्य रोखण्यात आले आहे. पाक सरकारला हक्कानी नेटवर्क, तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांविरोधात अशी कारवाई करावी लागेल, ज्याचे परिणामही दिसतील. पाकच्या इशा-यावर दहशतवादी अमेरिकेला लक्ष्य करत आहे, असा गंभीर आरोप हीदर यांनी केला आहे. आता आपण दक्षिण आशियासंबंधी नवे धोरण स्वीकारले आहे, असे त्यांनी सांगितले.
2) राज्याच्या रेती धोरणात बदल
रेतीघाटातून अवैध उत्खनन होऊ नये, यासाठी लिलावधारकालाच रेतीघाट व तपासणी नाका अथवा वाहतुकीच्या वाहनातच सीसीटिव्ही बसवून छायाचित्रणाची सीडी दर दोन आठवड्यांत तहसीलदारांना सादर करण्याची तरतूद राज्य शासनाने नव्या रेती धोरणात केली आहे़. राज्य शासनाने जुन्या रेती धोरणात अनेक बदल केलेत़ त्यानुसार प्रत्येक रेती घाटावर वाहतुकीसाठी एकच रस्ता ठेवला जाणार आहे़ घाटावर छायाचित्रण करण्यासाठी लिलावधारकांनाच सीसीटिव्ही कॅमेरा बसवावा लागणार आहे़ विशेष म्हणजे, किमान एक सीसीटिव्ही कॅमेरा वाहतुकीच्या साधनातच बसविणे बंधनकारक आहे़ शिवाय, घाटातील रेतीची वाहतूक करणारी सर्व वाहने गावातील ज्या ठिकाणावरून ये-जा करतात़, त्या मार्गावरही छायाचित्रणासाठी कॅमेरा लावण्याचे बंधन घालण्यात आले़. लिलाव न झालेल्या घाटावर रेतीची अवैध वाहतूक होण्याची शक्यता आहे़ त्या मार्गातही कॅमेरा बसविणे आवश्यक आहे. केवळ याच मार्गावरील सीसीटिव्हींचा खर्च जिल्हा नियोजन समिती उचलणार आहे, असेही या धोरणात नमूद केले़ लिलावधारकांनी सादर केलेली सीडी तहसीलदारांना प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी केव्हाही रेतीघाटाची तपासणी करू शकतात़.
3) अय्यप्पा मंदिरासाठी वयाचा दाखला महिलांना आवश्यक
केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करू इच्छिणा-या महिलांना लवकरच वयाचा दाखला सोबत न्यावा लागणार आहे. भगवान अय्यप्पा ‘नैस्तिक ब्रह्मचारी’ असल्याने या मंदिरात मासिक पाळी येण्याच्या वयाच्या वयोगटातील (१० ते ५० वर्षे) महिलांना अजिबात प्रवेश न देण्याची पूर्वापार प्रथा आहे. तरीही या वयोगटातील महिला मंदिरात प्रवेश करण्याचा आग्रह धरतात. यामुळे या भाविक महिला व मंदिराचे कर्मचारी व पोलीस यांच्यात वादावादी होते. असे अप्रिय प्रकार टाळण्यासाठी महिलांनी आपण प्रतिबंधित वयोगटातील नाही हे खात्रीपूर्वक दाखविण्यासाठी वयाचा मान्यताप्राप्त दाखला सोबत आणावा, असा नियम लवकरच करण्यात येणार आहे. मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष ए. पद्मकुमार यांनी सांगितले की, मंदिराच्या प्रथा आणि परंपरांशी तडजोड केली जाऊ शकत नाही.
4) बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड
राज्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, सुलभ शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कंपनी शाळा ही संकल्पना सुरू होत आहे. शासनाच्या अनुदानित- विनाअनुदानित आदी सर्वच शाळांप्रमाणे या कंपनी शाळांना नियम असतील. त्यातून नुकसान होण्याऐवजी चांगलाच फायदा होईल असे सांगतानाच राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकन्डरी एज्युकेशन या संस्थांच्या धर्तीवर राज्यातील बिगर इंग्रजी शाळांसाठी राज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा गुरुवारी केली.
5) पाकिस्तानचे १० सैनिक ठार
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गुरुवारी पहाटे जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर धडक कारवाई करत पाकिस्तानच्या दोन चौक्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत पाकिस्तानचे आठ ते दहा सैनिक ठार झाले आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून बुधवारी केलेल्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आर. के. हजरा हे वाढदिवशीच शहीद झाले होते. या घटनेनंतर २४ तासांतच बीएसएफने ही कारवाई केली.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.