1) महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक परिषद
राज्यात गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्याच्या पहिल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८’ या जागतिक गुंतवणूक परिषदेची घोषणा नुकतीच केली. अत्याधुनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी तसेच पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंड येथे १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पेपर प्रिंट (००२) या उपक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेच्या ‘मेड फॉर बिझनेस’ या टॅगलाइनचे अनावरण केले असून या माध्यमातून भविष्यातील औद्योगिक वृद्धीमध्ये महाराष्ट्र राज्याचे असलेले योगदान व त्या दृष्टीने राज्याची असलेली तयारी यावर लक्ष वेधून घेण्यात आले. ही पहिलीच तीनदिवसीय जागतिक गुंतवणूक परिषद रोजगार, शाश्वतता, पायाभूत सोयीसुविधा आणि भविष्यकालीन उद्योग या चार मुख्य स्तंभांवर आधारलेली आहे.मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८ बद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमच्या या पहिल्या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्राची भारतातील सर्व औद्योगिक गुंतवणुकीचे प्रवेशद्वार ही ओळख आणखी भक्कम करण्याचा आमचा हेतू आहे. एक असे राज्य जिथे नवनिर्मितीसाठी सर्वोत्कृष्ट बुद्धिमत्ता, उद्योग आणि सरकाविष्यासाठी सज्ज असलेले राज्य उभारण्यावर आम्ही भर देत आहोत,’ अशी पुष्टीही त्यांनी जोडली. या प्रसंगी मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८ हे स्मार्टफोन ॲप्लिकेशन तरी यंत्रणा समन्वयातून उद्दिष्ट्यपूर्ण करण्यात येईल.’ ‘औद्योगिक नावीन्यता आणि स्मार्ट उत्पादकतेमध्ये जगभरात सातत्याने अव्वल स्थानी असणारे एक फ्युचर रेडी म्हणजेच भसेच या परिषदेविषयीची सर्व माहिती पुरवणाऱ्या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०’ या स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध परीक्षकांनी परीक्षण केल्यानंतर, या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या व्यावसायिकाला बक्षीस म्हणून ५० लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार असून द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे ३० लाख व २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८ या उपक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून राज्य आणि सरकारांचे प्रमुख, राजकीय आणि कॉर्पोरेट नेते,यांना एकाच छताखाली आणण्याचा यामागचा उद्देश आहे.
2) महाराष्ट्रात ९२ टक्के नागरिकांना आधार कार्ड
डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत देशात ८८.५ टक्के नागरिकांना आधार कार्डाचे वितरण झाले आहे, तर महाराष्ट्रात ९२.६ टक्के नागरिकांना आधार कार्ड वितरित झाली आहेत. देशातील ११६ कोटी ५४ लाख २८ हजार ३७७ नागरिकांना ३१ डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत आधार कार्ड देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात ११ कोटी ७९ लाख १ हजार १८९ नागरिक आधार कार्डशी जोडले गेले आहेत. हे प्रमाण राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ९२.६ टक्के इतके आहे. राज्यातील पाच वर्षांखालील ९९ लाख ६२ हजार ६०३ बालकांपैकी डिसेंबर २०१७ अखेर ४० लाख ९० हजार १५२ बालकांची आधार नोंदणी झाली आहे, हे प्रमाण ४१.१ टक्के इतके आहे. देशातील ४३.५ टक्के बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. देशातील पाच वर्षांखालील १२ कोटी २९ लाख ५८ हजार ७४९ बालकांपैकी ५ कोटी ३४ लाख ७५ हजार ४३४ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे.
* १८ वर्षांखालील २ कोटी किशोरवयीनांना आधार.
महाराष्ट्रातील पाच ते अठरा वयोगटातील २ कोटी ९५ लाख ९ हजार ४८६ किशोरवयीन युवकांना २ कोटी ३९ लाख ६ हजार ८९७ युवकांना आधार कार्ड देण्यात आली आहेत. राज्यातील आधार नोंदणीचे हे प्रमाण ८२.६ टक्के इतके आहे. देशातील ३६ कोटी १० लाख ५४ हजार ३६९ पाच ते अठरा वयोगटातील बालकांपैकी ३७ कोटी ६७ लाख ४२ हजार ३२७ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. देशपातळीवरील आधार नोंदणीचे हे प्रमाण ७६.६ टक्के इतके आहे.
3) भारतीय वंशाच्या अझिझ अन्सारी यास गोल्डन ग्लोब पुरस्कार
अभिनेत्री एलिझाबेथ मॉसला दूरचित्रवाणीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदाच्या गोल्डन ग्लोबने गौरवण्यात आले. आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतानाच तिने अनेक पुरस्कार नावावर केले आहेत. द हँडमेड्स टेल मधील भूमिकेसाठी ३५ वर्षीय एलिझाबेथला हा पुरस्कार मिळाला. आेप्रा विन्फ्रे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच कृष्णवर्णीय ठरल्या आहेत. मास्टर ऑफ नन मधील अभिनयासाठी अझिझ अन्सारी यास सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनयासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अन्सारी हा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारा यंदाचा एकमेव आशियाई कलाकार ठरला आहे. अन्सारी भारतीय वंशाचा कलाकार आहे. तो मूळचा तामिळनाडूतील आहे. मात्र, त्याचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेत झाले आहे. ७५ व्या गोल्डन ग्लोबसाठी अभिनेत्री निकोल किडमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवारी झालेल्या रंगारंग कार्यक्रमात बिग लिटल लाइजसाठी हा पुरस्कार तिला मिळाला.
4) सक्षम उपक्रमाची राज्यभर होणार अंमलबजावणी
भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कल्पकतेतून साकार झालेल्या सक्षम उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. िवद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानातून बाहेर काढून त्यांच्या कौशल्य विकासावर भर देणाऱ्या या अभ्यासक्रमासोबत २१ कौशल्य व १० मूल्ये असलेला सक्षम उपक्रम जिल्हा प्रशासनाने नुकताच तयार केला आहे. स्वच्छता व नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, सौजन्यशीलता, सर्वधर्म सहिष्णुता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रभक्ती ही १० मूल्ये या उपक्रमात आहेत. वाटाघाटी, उत्कृष्टता, संघर्ष व्यवस्थापन, निर्णयक्षमता, ताणतणावाचे व्यवस्थापन, डिजिटल नागरिकत्व, उद्योजकता, जिज्ञासा, दृश्यक्षमता, नेतृत्व पुढाकार, कल्पना निर्मिती, समस्या निराकरण, चिकित्सक विचारप्रणाली, प्रणाली विचार, माहिती साक्षरता, पार्श्विक विचार, नवनिर्मिती, समानुभूती, लवचिकता, स्वचा विकास, अनुकूलता अशा २१ कौशल्याचा अंतर्भाव सक्षम उपक्रमात आहे.
5) महिला विशेष असलेले माटुंगा स्थानक लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये
महिला विशेष असलेल्या मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. स्थानकातील विविध कामांसह स्थानकातील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला अधिकारी-कर्मचारी यांच्यावर आहे. महिलांमार्फत कामकाज करणारे स्थानक म्हणून देशातील पहिले उपनगरीय रेल्वे स्थानकाचा मानदेखील माटुंगा स्थानकाला मिळाला आहे.
जुलै २०१७ रोजी ३४ महिलांची नियुक्ती करून हे स्थानक महिला विशेष स्थानक घोषित करण्यात आले. माटुंगा स्थानकाजवळ विविध महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ येथे सर्वाधिक असते. यामुळे स्थानकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलातर्फे महिला अधिकारी-कर्मचा-यांची मागणी करण्यात आली होती. माटुंगा स्थानकावर सद्य:स्थितीत २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षकांसह ११ तिकीट बुकिंग क्लार्क, ७ तिकीट तपासनीस, अन्य कामांसाठी ५ कर्मचारी आणि २ उद्घोषणा करणा-या महिला यांचा समावेश आहे. स्थानक-प्रवासी सुरक्षिततेसाठी आरपीएफच्या ५ महिला अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.
6) आंतरराष्टय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला महिला इंटरनॅशनल मास्टरचा पहिला नॉर्म
आंतरराष्टय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला महिला इंटरनॅशनल मास्टरचा पहिला नॉर्म मिळाला आहे. २९ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत दिव्याने डब्ल्यूआयएम नॉर्म प्राप्त केला. तीन नॉर्म मिळविणारी बुद्धिबळपटू महिला इंटरनॅशनल मास्टर बनते. याच स्पर्धेत तिला उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेत ८९ वी मानांकित असलेल्या दिव्याने ३७ वे स्थान पटकविले. या स्पर्धेत ३१५ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अखेरच्या फेरीआधीच दिव्याने हा बहुमान मिळविला.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.