(१) मराठी, इंग्रजी (भाषा विषय)
(२) सामान्य अध्ययन आणि (३)अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी या आजच्या या लेखामध्ये आपण २०१७ व २०१८ च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची विभागनिहाय उजळणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण मराठी आणि इंग्रजी विषयाच्या मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांची रणनीती पाहू या. (या प्रश्नांतील योग्य उत्तरांचा पर्याय ठळक केला आहे.)
* शब्दाला जोडून आलेल्या अव्ययांना काय म्हणतात?
(१) उभयान्वयी अव्यये (२) शब्दयोगी अव्यये
(३) क्रियाविशेषण अव्यये
(४) केवळप्रयोगी अव्यये
* संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत?
(१) आणि व
(२) म्हणून यास्तव
(३) परंतु पण
(४) जर तर
* ‘अं’ आणि ‘अ:’ या दोन वर्णाना ——- असे म्हणतात.
अ. अनुस्वार
ब. स्वर
क. स्वरादी
इ. व्यंजने
(१) अ आणि ब बरोबर
(२) क आणि ड बरोबर
(३) फक्त क बरोबर
(४) फक्त ड बरोबर
* ‘अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
(१) अतिखाणे नुकसानकारक असते.
(२) आरशात तोंड पाहून रूप न्याहाळणे.
(३) स्वत:ची चूक लपविण्याचा प्रयत्न करणे,
(४) अतिशय उतावळेपणाची कृती.
* ‘न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
a. कर्मकर्तरी प्रयोग
b. कर्मभाव संकर प्रयोग
c. कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
(१) फक्त d बरोबर बाकी सर्व चूक
(२) b आणि c बरोबर बाकी सर्व चूक
(३) a आणि c बरोबर बाकी सर्व चूक
(४) फक्त a बरोबर बाकी सर्व चूक
२०१७ व २०१८ पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेले इंग्रजी घटकावरील प्रश्न
* Identify the correct sentence.
She got up when the alarm clock went off.
Erika had dropped her bag while she was getting into her car
It was the first time I’d talked to Ella outside the office.
She will be taking up her place at University in October
(1) a and c (2) band d
(3) a, c and d (4) b, c and d
* Choose the appropriate pair to fill in the blanks in both the given sentences.
Measles is highly——
England is the only country to
——–Wales
(1) contagious, contagious
(2) contiguous, contagious
(3) contagious, contiguous
(4) contiguous, contiguous
* Complete the sentence with who, which, whom or what.
– of them broke the window?
(1) Who. (2) Whom
(3) What. (4) Which
* I met unexpectedly an old friend yesterday at the bus station.
Select the correct alternative that could replace the underlined part meaningfully
(1) caught at.
(2) came across
(3) waited on
(4) went by
* parents sat up half the night.
Which one of the following correctly fills the blank in the above sentence ?
(1) Both of (2) Both the
(3) The both (4) Both
मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप पाहता विचारलेले प्रश्न हे अतिशय सोप्या पद्धतीचे आहेत असे आपल्याला दिसून येईल. मराठी विषयावरील प्रश्न सर्वसामान्य शब्दसमूह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा
अर्थ व उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे यावर विचारलेले आहेत
तर इंग्रजीचे प्रश्न Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms & phrases and their meaning and comprehension of passageयावर विचारलेले आहेत. अभ्यासक्रमामध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी बारावीच्या दर्जाचे हे प्रश्न आहेत.
याचा अभ्यास प्रभावीपणे करण्यासाठी मो. रा. वाळिंबे (मराठी व्याकरण) आणि पाल अॅण्ड सुरी हे इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक संदर्भासाठी वापरणे उपयुक्त ठरेल. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांची उजळणी केल्यास आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा अभ्यास शक्य होईल.
– संतोष बंडगर