⁠
JobsMPSC

MPSC गट क : पदांमध्ये मोठी वाढ ; शासनाकडून नवे ज्यादा पदांचे मागणीपत्र प्राप्त

MPSC Group C Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) विविध पदांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. एकूण २२८ जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे.

अपडेट : या बाबत आयोगाने दिनांक ०८ ऑगस्ट रोजी प्रसारमाध्यमांच्या मार्फत कळवले आहे. या नुसार : महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता दिनांक 29 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये (जाहिरात क्रमांक 77/2022) कर सहायक संवर्गाची 114 पदे समाविष्ट करण्यात आली होती. तदनंतर शासनाकडून प्रस्तुत संवर्गाच्या 367 ज्यादा पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. यास्तव, प्रस्तुत जाहिरातीद्वारे कर सहायक संवर्गाच्या एकूण 481 पदाकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

एकूण जागा : २२८ ५९५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 06
शैक्षणिक पात्रता
: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.  

2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 09
शैक्षणिक पात्रता : प
दवीधर.

3) कर सहाय्यक, गट-क 114 481
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

4) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 89
शैक्षणिक पात्रता :
 (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

5) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क 10
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1, 4 & 5: 19 ते 38 वर्षे.
पद क्र.2 & 3: 18 ते 38 वर्षे.

शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक) :

पुरुष :
उंची –
१६५ से.मी
छाती: ७९ सेमी व फुगवून ५ सेमी जास्त

महिला :
उंची –
१५५ से.मी.
वजन – ५० कि.ग्रॅ.

परीक्षा फी : ३९४/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – २९४/- रुपये, माजी सैनिक – ४४/- रुपये]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022 (11:59 PM)

पूर्व परीक्षा दिनांक: ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button