महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट-क पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी 27 जून 2026 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. MPSC Group C Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 2619
परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
| पद क्र. | पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
| 1 | उद्योग निरीक्षक | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | 09 |
| 2 | तांत्रिक सहायक | वित्त विभाग | 03 |
| 3 | कर सहायक | वित्त विभाग | 282 |
| 4 | सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क | गृह विभाग | 461 |
| 5 | लिपिक-टंकलेखक | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये | 1864 |
| Total | 2619 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026
पूर्व परीक्षा (CBT): 27 सप्टेंबर 2026 पासून
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in







