---Advertisement---

MPSC Success Story : परिस्थितीवर मात करून शेतकरी मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ध्येय गाठण्यासाठी जिद्द अन चिकाटी असेल, तर यशाला गवसणी घालण्यापासून कोणीचं रोको शकत नाही. असचं काहीसं बीडच्या (Beed) शेतकरी कन्येनं करून दाखवून दिलंय. कोणतेही क्लास न लावताना, सेल्फ स्टडी (Self Study) करत एमपीएससीमध्ये (MPSC) घवघवीत यश संपादन केलंय. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ पोलीस उपनिरीक्षक पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एनटीसी गटात मुलींतून बीडमधील धारूर तालुक्यातील अंजनडोह गावची अश्विनी बालासाहेब धापसे (Ashwini Dhapse) हिने प्रथम क्रमांक मिळवला.

परिस्थितीवर मात करून यश मिळालेल्या अश्विनी बालासाहेब धापसेचे आता पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून, लवकरच ती पोलीस उपनिरीक्षक म्हणून लोकसेवा करणार आहे. तिच्या खांद्यावर ‘स्टार’ लागणार असल्याने सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

अंजनडोह येथील शेतकरी बालासाहेब धापसे यांची मुलगी आश्वीनी धापसेनी  1ली ते 10 पर्यंतचे शिक्षण गावातच असलेल्या नुतन माध्यमिक विद्यालयात पुर्ण केले होते. सात एकर जमीन, तिही कोरडवाहू त्यात एक मुलगी, दोन मुले असे पाच जणांचे कुटूंब. 10 वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 88 टक्के गुण मिळाल्यानंतर अश्विनी धामसे हिचा शासकीय तंत्रमिकेतन कॉलेज औरंगाबाद येथे नंबर लागला होता. तीन वर्षे येथे शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापिठात अभियांत्रीकीचे शिक्षण घेतले. नंतर 2017 पासून एमपीएससी परिक्षेची तयारी सुरु केली. एक वर्षाच्या अभ्यासानंतर सन 2018 मध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा दिली होती. या परीक्षेत दोन गुणांनी तिचा नंबर हुकला होता.

अश्विनी धापसे पुन्हा औरंगाबाद येथे राहून अभ्यास केल्यनंतर मार्च  2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाची पीएसआय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत (एनटी- क) गटात मुलींतून धारुर तालुक्यातील अंजनडोह गावची अश्विनी बालासाहेब धापसे हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ही बाब अंजनडोहच नाही तर बीडकरासाठी अभिमानाची आहे.

अश्विनीच्या यशात भावाचा मोठा वाटा
अश्विनी आता पोलीस अधिकारी होणार आहे. तिच्या या यशात मोठा वाटा तिच्या भावांचा आहे. आश्विनीच्या एमपीएससी परीक्षेत तिचा मोठा भाऊ योगीनंद धापसे यांची मोठी मदत झाली. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याने खाजगी कंपनीत नोकरी करून आर्थिक मदत केली.

अश्विनीची घरची परिस्थिती हलाखीची आहे. वडिलांना अवघी पाच एकर शेती. बालासाहेब धापसे यांनी मेंढ्या सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत दोन मुले व मुलींचे शिक्षण पूर्ण केले. अश्विनीने दहावीपर्यंतचे शिक्षण अंजनडोह येथे तर कोल्हापूर येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतले. औरंगाबाद येथे मोठा भाऊ योगीनंद यांच्यासोबत राहून त्यांच्या प्रेरणेने स्वअध्ययन करत पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केले. यात तिला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.

हे पण वाचा :

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts

Comments are closed.