आई – वडिलांच्या कष्टाचे चीज झाले ; लेकीची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड !
MPSC PSI Success Story : शेतकऱ्याच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. त्याला कष्टाचे आयुष्य जीवनभर करावे लागते. हे कष्ट जाणून उच्च शिक्षित होऊन अधिकारी होणे ही खरंच अभिमानास्पद बाब आहे. हे शैलाने करून दाखवले आहे. ती गावातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक बनली आहे. शैला ही मूळची मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रूक येथे राहणारी लेक.
तिला लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड. त्यामुळेच तिने पायपीट करून तीन किलोमीटर अंतरावरील गावातील शाळा कशीबशी सहा महिने केली. मग मामांच्या गावी येसगाव बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेत पुन्हा सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले. तिने दहावीपर्यंत शिक्षण घेऊन ८३ टक्के गुण मिळविले.
मालेगावात आरबीएच कन्या विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ७२ टक्के गुण मिळवले. त्यानंतर मसगा महाविद्यालयात इंग्रजी विषयात पदवी संपादन केली व पुढे एम.ए शिक्षण हे पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात तिच्या कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली. तिचे वडील बापू पाथरे गेल्या तीस वर्षांपासून चाळीसगाव फाटा येथे हॉटेलमध्ये स्वयंपाकी (कुक) म्हणून काम करतात. तर आई मोलमजूरी करते.
ग्रामीण मातीतील आई बाबांच्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न तिने बघितले. त्यासाठी तिने पुणे गाठले.पुण्यातील शैक्षणिक वातावरणाच प्रभाव यामुळे जिद्दीने सलग चार वर्षे अभ्यास केला.यामुळेच तिच्या मेहनतीला फळ आले. शैला
गावातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक बनली.