⁠  ⁠

शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक ; वाचा त्याच्या यशाची कहाणी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC PSI Success Story : डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हजारो अडचणींना तोंड द्यावे लागते. पण त्यांच्यामध्ये देखील जिद्द असते. त्या स्वप्नांना वाट दाखवली तर ते देखील स्वप्न साकार करू शकतात. असाच एक होतकरू मुलगा अक्षय रत्न झगडे.

सिन्नर शहराच्डोंगर माथ्यावर राहणारा, शेतकरी कुटुंबातील हा मुलगा. सामान्य घरात जडणघडण झाली असली तरी त्याची वाटचाल ही असामान्य आहे. त्याचे वडील हे नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर बायपासला डोंगर माथा उताराला मळा शेतकरी म्हणून काम करतात. त्याचे सिन्नरच्या जनता विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर सिन्नर महाविद्यालयात बारावी सायन्स झाले. शेतकरी कुटूंब असल्याने भाऊ सचिनसह वडीलांना शेतात मदत करावी या हेतूने कला शाखेत पदवीधर होण्याचा निर्णय घेतला.

मोठा मुलगा शेती संभाळत असल्याने अक्षय नोकरी करावी असं त्याच्या आई – वडिलांना वाटतं होतं.आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्याने राज्यशास्त्र पदवीच्या दुसरा वर्षात असताना पोलिस भरतीची तयारी केली.

पोलिस होण्याचं स्वप्न होतं.घरीच सराव केला.पण ही भरती झाली नाही.मग २०१९ला पदवी पूर्ण झाल्यावर अक्षयने पुणे गाठले. येथे पोलिस उपनिरीक्षक साठी स्पर्धा परीक्षा क्लासेस सुरू केला.शिक्षण घेऊन पोलीस भरती प्रक्रिया करण्याची दिशा ठरवली.

सातत्याने सराव करत असताना शासनातर्फे पोलिस भरती वेळेत झाली नाही. त्यामुळे काॅलेज मित्रांनी हा पोलिस होण्याचा नाद सोडून दे असे सुनावले.पण त्याने जिद्द सोडली नाही. सातत्याने तयारी करत राहिला. त्यामुळेच अक्षय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी यश मिळाले. त्याचे लोकांसाठी सेवा करणे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Share This Article