स्पर्धा परिक्षेच्या क्लासमध्ये काम करणारा ऑफिस बॉय झाला पोलिस उपनिरीक्षक!
MPSC PSI Success Story प्रत्येक मुलाचे आपल्या मुलासाठी अपार कष्ट घेतात आणि उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण अतूलचे लहानपणीच वडील वारले. वडिलांचे छत्र हरवल्याने त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अतुल प्रकाश आडे एका सामान्य कुटुंबातून लहानाचा मोठा झालेला मुलगा. त्याचे मूळ गाव नांदेडमधील वायवाडी तांडा. साधारण तो अकरावीला असावा तेव्हा त्याचे वडील गेले त्यामुळे, घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली. यात त्याला आई व भावाचा आधार हा होताच.
अतूलचे प्राथमिक शिक्षण वायवाडी येथे झाले. दहावीनंतरचे शिक्षण त्यांनी उमरी येथे केले. बारावीत यशवंत कॉलेज उमरीमधून प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी आपण काहीतरी करु शकतो हे त्यांना उमगले आणि त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष वळवले. म्हणून त्याने पदवीचे शिक्षण नांदेडमध्ये पूर्ण केले. हा शैक्षणिक प्रवासच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला म्हणायला हरकत नाही.
त्याच्या गावाकडे अवघी दोन एकर शेती होती. त्यावर उदरनिर्वाह कसा चालवायचा हा आईसह त्याच्यापुढेही मोठा प्रश्न होता. म्हणून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याच्यांच गावातील अविनाश राठोड यांच्या स्पर्धा परिक्षांच्या क्लासमध्ये त्यांनी ऑफिस बॉय म्हणून जॉब करत करत अभ्यास केला.
त्याठिकाणी येणाऱ्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तो निरिक्षण करायचा. तिचं प्रेरणा घेऊन काम संपल्यावर आपला अभ्यास करायचा.याच संपूर्ण मेहनतीचे फळ त्यास मिळाले असून अतूलची यंदा पीएसआय पदी निवड झाली. हा आनंद त्याच्या आईच्या गगनाला मावेनासा होता.