स्पर्धा परिक्षेच्या क्लासमध्ये काम करणारा ऑफिस बॉय झाला पोलिस उपनिरीक्षक!

Published On: सप्टेंबर 26, 2023
Follow Us

MPSC PSI Success Story प्रत्येक मुलाचे आपल्या मुलासाठी अपार कष्ट घेतात आणि उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण अतूलचे लहानपणीच वडील वारले. वडिलांचे छत्र हरवल्याने त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अतुल प्रकाश आडे एका सामान्य कुटुंबातून लहानाचा मोठा झालेला मुलगा. त्याचे मूळ गाव नांदेडमधील वायवाडी तांडा. साधारण तो अकरावीला असावा तेव्हा त्याचे वडील गेले त्यामुळे, घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली. यात त्याला आई व भावाचा आधार हा होताच.

अतूलचे प्राथमिक शिक्षण वायवाडी येथे झाले. दहावीनंतरचे शिक्षण त्यांनी उमरी येथे केले. बारावीत यशवंत कॉलेज उमरीमधून प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी आपण काहीतरी करु शकतो हे त्यांना उमगले आणि त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष वळवले. म्हणून त्याने पदवीचे शिक्षण नांदेडमध्ये पूर्ण केले. हा शैक्षणिक प्रवासच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला म्हणायला हरकत नाही.

त्याच्या गावाकडे अवघी दोन एकर शेती होती. त्यावर उदरनिर्वाह कसा चालवायचा हा आईसह त्याच्यापुढेही मोठा प्रश्न होता. म्हणून त्याने‌ स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याच्यांच गावातील अविनाश राठोड यांच्या स्पर्धा परिक्षांच्या क्लासमध्ये त्यांनी ऑफिस बॉय म्हणून जॉब करत करत अभ्यास केला.

त्याठिकाणी येणाऱ्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तो‌ निरिक्षण करायचा. तिचं प्रेरणा घेऊन काम संपल्यावर आपला अभ्यास करायचा.याच संपूर्ण मेहनतीचे फळ त्यास मिळाले असून अतूलची यंदा पीएसआय पदी निवड झाली. हा आनंद त्याच्या आईच्या गगनाला मावेनासा होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025