शेतकऱ्याचा लेकाची आधी मंत्रालयात लिपीक तर आता PSI पदी नियुक्ती!

Published On: जानेवारी 25, 2024
Follow Us

MPSC PSI Success Story : वसमत तालुक्यातील धामणगाव येथील गजानन चंपतराव हरबळे यांनी गावाचे नाव रोषण केले आहे. गजाननची परिस्थिती बेताची होती. घरचे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून असल्याने शेतीवर उदरनिर्वाह चालतो.

गजानन यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुणे येथे आपली तयारी सुरु ठेवली. याच मेहनतीच्या जोरावर त्याची मंत्रालयात लिपिक म्हणून निवड झाली होती. अजून चांगली पोस्ट मिळावी यासाठी त्याने अभ्यासाला सुरुवात केली.

राज्यातील पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात २०२० मध्ये जाहीर झाली होती. त्याची पूर्व परीक्षा २०२१ ला, मुख्य परीक्षा २०२२ ला झाली. शारीरिक परीक्षा फेब्रुवारीत तर मुलाखत मार्च मध्ये होऊन त्याचा निकाल जुलै २०२३ मध्ये जाहीर झाला. यात त्याची पीएसआय पदी निवड झाली. पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून धामणगाव आणि पंचक्रोशीतील पहिला पीएसआय होण्याचा बहुमान मिळवला आहे. ही गावासाठी अभिमानाची बाब आहे.तसेच गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर होतकरू मुलांना नक्कीच त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल. त्याने जिद्द, चिकाटी, अनुभव आणि स्वयंअध्ययनाच्या जोरावर त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करून दाखवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025