स्वतःशी प्रामाणिक राहिले की यश हे मिळतेच ; गायत्रीची उपनिरीक्षकपदाला गवसणी !
MPSC PSI Success Story : अभ्यासातील सातत्य, संयम आणि चिकाटी हे स्पर्धा परीक्षेच्या यशाची त्रिसूत्री आहे. ही त्रिसूत्री अंगिकारली तर यश नक्कीच मिळते. असेच इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील चव्हाणवाडीतील ही लेक. तर गायत्रीचे शिक्षण बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये झाले. विद्या प्रतिष्ठानच्या मराठी शाळेमधून प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
अकरावी टी.सी कॉलेज व बारावी भिगवण जवळील दत्तकला शिक्षण संस्थेमधून झाली. पदवी व पदव्युत्तर शिक्षण पुण्यातील कृषी महाविद्यालयांमधून झाले. नंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.सध्या गायत्री चव्हाण या राहुरीमधील महात्मा कृषी विद्यापीठामध्ये विस्तार शिक्षण विभागामध्ये पीएचडी करीत असून द्वितीय वर्षाला आहेत. या काळात तिनेस्वतःवर नियंत्रण ठेवले आणि स्वतःशी प्रामाणिक राहिली. समाजमाध्यमांचा वापर देखील कमी केला.
यशस्वी होण्यासाठी संयम, प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो.हे तिला गवसले होते. ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कोरोनामुळे परीक्षा रखडल्या होत्या. पण तिने या काळाचा चांगला उपयोग करून घेतला.
कोरोनाच्या काळामध्ये ही अभ्यासमध्ये सातत्य ठेवल्यामुळे यश मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची फेब्रुवारी २०२० ची जाहिरातीची परिक्षा प्रक्रिया कोरोनामुळे काही काळ थांबली होती. २४ मार्च २०२३ अंतीम परीक्षेची मुलाखत झाली होती. आयोगाने ईडब्यूएस आरक्षणामुळे निकाल राखून ठेवला होता. पण आता तिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. या यशात तिच्या माहेर आणि सासर या दोघांचा हातभार आहे.