---Advertisement---

जिद्दीला सलाम! विविध पदांसाठीच्या 30 मुख्य परीक्षा‌ दिल्या; अखेर भाऊसाहेबला बनला पोलीस उपनिरीक्षक

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : घरची परिस्थिती बेताची…त्यात डोंगराळ भागातील बालपण व जडणघडण…पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजूर म्हणून जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यात तर राज्यात देखील ऊस तोडणीसाठी जातात. तसेच हे देखील कुटुंब जात असे.

भाऊसाहेब जाधव यांच्या वडिलांचा मूळ व्यवसाय शेती आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून होते. आई-वडिलांचं स्वप्न होतं की, मुलांना मोठा साहेब व्हावं. परंतु, एमपीएससी परीक्षेमध्ये यश हे एका परीक्षेत येत नाही. हे आपण अनेक उदाहरण पाहिले आहेत. अनेक वेळा परीक्षा देऊनही अनेक विद्यार्थी अपयशी ठरतात. त्याच पद्धतीने भाऊसाहेब जाधव यांनी तब्बल एमपीएससीच्या विविध पदांच्या ३० मुख्य परीक्षा देऊन देखील यश मिळत नव्हतं.

तरी त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. त्यांचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राज पिंपरी गावापासून काही अंतरावर असलेल्या मुळशी तांडा या डोंगराळ भागात वास्तव्यास असलेले ; बारावीमध्ये एक वेळेस नापास झाल्यानंतर पुन्हा एकदा बारावीची परीक्षा दिली आणि पास झाल्यानंतर पदवी शिक्षण शासकीय अभियांत्रिकी कॉलेज रायगड येथून पूर्ण केले. मग त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. पण अनेकदा प्रयत्न करूनही यश आणि पद मिळत नव्हते. त्याने प्रयत्न करायचे सोडले नाही.

चूका समजून घेतल्या त्यात सुधारणा केल्या. पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. अखेर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळालं. अनेक वर्ष आई-वडिलांनी ऊस तोडून आपल्या मुलांला शिकवलं. लहानाचं मोठं केलं आणि आज अनेक दिवसानंतर हे यश पाहायला मिळालं.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now