⁠
Inspirational

भाजी विक्रेत्याच्या मुलाची PSI पदाला गवासणी!

आपल्या आई – वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मेहनतीने अभ्यास केला तर यश हे मिळतेच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत बबन दांगट. प्रशांत हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असून त्याचे कुटुंबीय निरगुडसर येथे शेतमजुरी तसेच भाजीपाल्याचा व्यवसाय करतात.

या कष्टाची जाणीव प्रशांतने ठेवली आणि शिक्षणाची वाट धरली. प्रशांतचे शालेय हे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंगडेवाडी येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण हे शिक्षण पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर, उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व अण्णासाहेब आवटे कॉलेज येथे झाले. पदवी शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला त्याने पुणे गाठले.

पुण्यातील ग्रंथालयात बसून त्याने दिवसरात्र मेहनत घेतली.तो गेली चार-पाच वर्ष एमपीएससीचा अभ्यास करत होता. अनेक सरकारी नोकरीच्या संधीच्या शोधात होता. अनेक परीक्षेत यश आले नाही मात्र जोमाने अभ्यास करत राहिला.

अखेर, त्याला यश मिळाले. नुकताच एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल लागला असून प्रशांत याने ४४० पैकी ३४९ गुण मिळवून त्याचा राज्यात सहावा क्रमांक आला आहे.आपल्या आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरून प्रशांतने पीएसआय पदाला गवसणी घातल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या यशामागे आई, वडील, दोन भाऊ, बहिण, मित्र परिवार, नातेवाईक यांचा मोलाचा वाटा आहे.

Related Articles

Back to top button