⁠
Inspirational

भावडांकडून प्रेरणा घेत ऋषिकेशची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी !

MPSC Success Stroy : आपल्या आजूबाजूला असणारे वातावरण ही आपली प्रेरणा बनत असते. ऋषिकेश बाळू मुठे याचा मोठे भाऊ हे ग्रामसेवक व बहीण या पोलिस खात्यात आहेत. त्यामुळे आपण पण स्पर्धा परीक्षा दिली तर अधिकारी शकतो ही प्रेरणा मिळाली.

त्याचे वडील मुंबईत असल्याने ऋषिकेशने बारावीनंतर मुंबईत बीकॉमची पदवी मिळवली.पुढे त्याने एमपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली. दररोज १२ तास अभ्यास करण्यासाठी वेळापत्रक बनवले आणि ते तो पाळत होता. हिराचंद नेमचंद वाचनालयात रोज वाचन व अभ्यास करायचा. रात्री छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात अभ्यास करायचा. त्यामुळे त्याने सलग दोन वेळा एमपीएससी पास केली.

या परिश्रमामुळे ऋषिकेशने एकाचवेळी सात पदाच्या विविध परीक्षा दिल्या होत्या. त्यापैकी विक्रीकर निरीक्षक पदासाठीचे यश केवळ ६ गुणांनी हुकले. याशिवाय इतर सहा पदाच्या परीक्षांमध्ये तो यशस्वी झाला. यामध्ये एसटीआय, एक्साईज, टेक्निकल असिस्टंट, क्लर्क, टॅक्स असिस्टंट या पदाच्या परीक्षांचा समावेश होता. पण विक्री कर निरीक्षक किंवा पोलिस उपनिरीक्षक या दोन पदासाठी प्रयत्न करायचे असे ठरवून कोरोनानंतर त्याने दुसऱ्यांदा एमपीएससीची परीक्षा दिली. यात देखील त्याला यश मिळाले‌. घरात शासकीय नोकरीत असलेल्या भावंडापासून प्रेरणा घेत ऋषिकेशने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

Related Articles

Back to top button