⁠  ⁠

गावातील पहिला अधिकारी ; शेतकरी पुत्र झाला पीएसआय !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC PSI Success Story : आपण एखादी गोष्ट जिद्दीने करायची ठरवली तर नक्कीच पूर्ण होते. याचे उदाहरण म्हणजे वैजनाथ पाटील. वैजनाथ हा मूळचा देवडे येथील रहिवासी.त्याचे वडील शेतकरी त्यात अल्पभूधारक असल्यामुळे घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. पण त्याने शिकण्याचा ध्यास घेतला होता.

यात वडील नागनाथ आई मैना भाऊ आप्पाराव आणि वहिनी यांची मोलाची साथ मिळाली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,देवडे येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण कृषी विद्यालय, शेळवे येथे पूर्ण झाल्यावर त्याने पुढील शिक्षण घेण्यासाठी पंढरपूर गाठले. उच्च माध्यमिक शिक्षण उमा कॉलेज पंढरपूर तसेच पदवीचे शिक्षण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून कृषी अभियंता बी.टेक पदवी संपादन केली.

या शिक्षणाच्या प्रवासात त्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली आणि त्याने तयारीला सुरुवात केली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१९ मध्ये पहिल्या प्रयत्न मेन्सपर्यंतचा पल्ला गाठला. परंतू न्यायालयाच्या काही अडचणीमुळे परीक्षेचा निकाल राखून ठेवल्यामुळे २०२०च्या निकालाची वाट न बघता २०२१च्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरला. पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात‌ केली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेला गावातील पहिला अधिकारी वैजनाथ पाटील होण्याचा मान मिळवला.

Share This Article