---Advertisement---

आईने टेलरिंगचे काम केले आणि मुलांना उच्च शिक्षित केले; जनार्दन झाला PSI

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story आपल्या हिंमतीच्या जोरावर मिळवलेले कोणतेही यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी असते. तसेच राजापूर येथील गरीब कुटुंबातील जनार्दन बैरागी याने मिळविलेले यश नव्या पिढीला प्रेरणादायी नव्हे, तर आदर्शवतच आहे.

जनार्दनचे वडील वारल्यानंतर संपूर्ण जबाबदारी ही आईवर आली. आईने कुटुंबासाठी उदरनिर्वाह केला आणि मुलांना उच्च शिक्षित केले.जनार्दनची आई बालूताई यांनी टेलरिंग काम करून दोन मुलांचे शिक्षण केले. बालूताई बैरागी, आजोबा भीमाबाबा बैरागी, मामा गणेश बैरागी यांनी मुलांसाठी विशेष मेहनत घेतली.जनार्दनचा मामा गणेश रंगकाम करीत असल्याने तोही त्यांना मदत करायचा. दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचणी, कांदालागवड असे रोजंदारीची काम करून आपले शिक्षण राजापूर व नंतर येवला येथे केले.

जनार्दनचे शालेय शिक्षण गावातच झाले. त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू‌ ठेवला. घरचे वातावरण हे शिक्षणासाठी पुरक नव्हते.ध्येय, प्रबळ इच्छाशक्ती अन्‌ प्रचंड मेहनती घेतली तर भाग्य उजाळल्याशिवाय राहत नाही हे सिद्ध केले आहे.त्याचेॲ आजोबाचे वडील (वै.) हिरामणबाबा बैरागी यांच्या आशीर्वादाने भिमाबाबा बैरागी आजही रोज गावात भिक्षा मागतात. या भिक्षेचे फळ जनार्दन बैरागी यांना मिळाले आहे. जनार्दनची डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली.आईच्या कुटुंबाला माधवगिरी (भिक्षा) मागण्याची परंपरा आहे. अशा सर्वसाधारण कुटुंबातील जनार्धन याने थेट दिल्लीत पीएसआयपदाला गवसणी घातली. याचवेळी वन विभागातही त्याला नियुक्ती मिळाली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts