MPSC PSI Success Story : कोणत्याही परिस्थितीसोबत मात करण्याची तयारी असली की आपण यशाला गवासणी घालतो. यामागे जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची आहे. राजापूर येथील जनार्धन बैरागी याने या जिद्दीच्या जोरावरच पीएसआयपदाला गवसणी घातली आहे.
लहानपणीच वडीलांचा हक्काचा आधार गेला… संपूर्ण जबाबदारी आईवर आली. जनार्दनची आई बालूताई यांनी टेलरिंग काम करून दोन मुलांचे शिक्षण केले. बालूताई बैरागी, आजोबा भीमाबाबा बैरागी, मामा गणेश बैरागी यांनी मुलांसाठी विशेष मेहनत घेतली.आईने मोलमजुरी करून मुलाला शिकवले. जनार्धनने देखील परिस्थितीची जाणीव ठेवली.
जनार्दनचा मामा गणेश रंगकाम करीत असल्याने तोही त्यांना मदत करायचा. दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचणी, कांदालागवड असे रोजंदारीची काम करून आपले शिक्षण राजापूर व नंतर येवला येथे केले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या प्रवासात त्याला अपयश आले तरी ते खचले नाहीतर हिंमतीने लढले. या बळावर त्याने पीएसआयपदाला गवसणी घातली. याचवेळी वन विभागातही त्याला नियुक्ती मिळाली आहे. राजापूर येथील गरीब कुटुंबातील जनार्दन बैरागी याने मिळविलेले यश नव्या पिढीला प्रेरणादायी नव्हे, तर आदर्शवतच आहे.