MPSC PSI Success Story : आपल्या स्वप्नांना कष्टाची जोड असेल तर यशाची पायरी नक्कीच गाठता येते. हेच वणी तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील निखिल धोबे या तरूणाने करून दाखवले आहे. त्याची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच…. संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून…. हाताशी जेमतेम सहा एकर शेती… संपूर्ण गावात जडणघडण असे असले तरी देशसेवा करण्याची जिद्द निखिल धोबे उराशी बाळगले. त्याचे वडील सुरेश धोबे हे शेतकरी तर आई कांताबाई ही गृहिणी….त्यांना सुबोध आणि निखिल ही दोन मुले. सध्या सुबोध आर्मीत कार्यरत आहे. आपल्या भावाप्रमाणे निखिलला देखील आर्मीत जायचे होते.
निखिलचे शालेय शिक्षण हे पिंपरी येथे झाले.तर माध्यमिक शिक्षण हे वेळाबाई येथे झाले. गावात सोयीसुविधा नसल्याने वणी येथे पुढील शिक्षण झाले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्याला देखील भावासारखे आर्मीत जायचे होते. पण बऱ्याच परीक्षा देऊनही यश मिळाले नाही. मग त्याने वणी येथेच राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत अभ्यास केला. तर त्याला मैदानी खेळाची जोड दिली. नियमितपणे वाचन व लेखन, मैदानी सराव यामुळेच निखिलने एमपीएससीच्या घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे. यामुळेच त्याची फौजदार ( पोलिस उपनिरीक्षक) पदी निवड झाली.