आनंद अन् दु:ख सोबतच आले वाट्याला… हलाखीच्या परिस्थितीशी मात करत ओम बनला PSI !

Published On: जानेवारी 27, 2024
Follow Us

MPSC PSI Success Story घरची परिस्थिती बेताची…आई-वडिलांनी कष्ट उपसून चार मुलांना वाढविले.पण कधी कसलीच कमी पडू दिली नाही.चार मुलांची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे ओमचे आई-वडील राबराब राबले. कडाक्याच्या थंडीत स्थलांतर करत बागायतदार जिल्ह्यांत ऊसतोडीच्या कामाला जाऊन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. अशा परिस्थितीत देखील ओम भागवत आघाव पोलीस उपनिरीक्षक झाला आणि त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

मराठवाड्यातील बीड हा राज्यातील दुष्काळी जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो.ओम हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील दहिवंडी या लहानशा गावात राहणारा रहिवासी. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झाले. ओमने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला पुढचे शिक्षण द्यायचे म्हणून वडील दिवंगत भागवत आघाव यांनी पत्नीला घेऊन थेट गुजरात गाठले. तेथे कारखान्यावर रोजंदारीने काम करून दोन पैसे जास्त पदरात पडतील, या आशेने कष्ट उपसले. ओमला उच्च शिक्षित केले. हे सर्व ओम त्याच्या डोळ्यांनी बघत होता. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. बारावी उत्तीर्ण केली आणि पोलिस भरतीची जाहिरात वाचण्यात आली. त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अर्ज भरला अन् शिपाई म्हणून नोकरीही मिळाली. पण एवढयावर थांबून चालणार नाही तर अधिकारी पद गाठले पाहिजे हा विचार मनाशी बाळगून त्याने अभ्यासाला सुरुवात केली.

२०१६ साली ओम पोलिस दलात भरती झाला. त्याचवर्षी वडिलांचे आकस्मिक निधन झाले आणि ओमसह संपूर्ण कुटुंबावर आभाळ फाटले. या आघाताने तोदेखील खचला. मात्र, पुन्हा जिद्दीने पेटून उठला आणि संघर्षावर विजय मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025