---Advertisement---

आई वीटभट्टी कामगार पण पठ्ठ्याने केली कमाल ; सागर झाला PSI अधिकारी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : कोणत्याही परिस्थितीसोबत सामना करत जीवन जगायला शिकलं की यश देखील मिळतेच. हेच बार्शीच्या लेकाने करून दाखवले आहे. बार्शीतील बायपासजवळील वीटभट्टीवर सागरची आई काम करते. आपल्या मुलाने शिकावं आणि पोलीस व्हावं, हे त्यांचं स्वप्न होते. या परिस्थितीची आणि स्वप्नांची जाणीव ठेवून सागरने देखील मेहनत घेतली. त्याचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हे गावातच झाले.

वडिलांच्या निधनानंतर मामा पिंटू चव्हाण यांनी आधार दिला, तर आईने वीटभट्टीवर काम करून मुलाला शिकवलं आणि या पदापर्यंत पोहोचवलं. सागर पावले यांच्यासाठी सुभाष नगर तळेवाडी ते पी.एस.आय हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मात्र, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध केले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.‌ वेळप्रसंगी काम करत त्याने अभ्यास केला.

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फतच्या ३७८ जागांसाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यामध्ये, बार्शी तालुक्यातून सागर पावले यांनी ३११ गुण मिळवत राज्यात ३२ वी रँक मिळवत यश संपादन केले. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा देऊन सागर यांनी जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांमधून स्वतःला सिद्ध केले.विशेष म्हणजे गतवर्षीच त्याने मंत्रालय कक्ष अधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर, तो मंत्रालयात रुजुही झाला. आता, त्याने पी.एस.आय पदी यश मिळवले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts