आपल्या उराशी जिद्द असेल तर कोणतेही यश गाठता येते. हेच स्नेहा चव्हाणने करून दाखवले आहे. तिची जडणघडण ही दुष्काळग्रस्त खंडाळा तालुक्यातील कान्हवडी गावामध्ये झाले. स्नेहाचा जन्म एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. तिचे वडील संजय हनुमंत चव्हाण प्रयोगशील शेतकरी म्हणून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत संसाराचा गाडा हाकत तर आई कुसुम घरकाम करुन मुलीच्या शिक्षणाला हात भार लावतात. त्यांनी आई – वडिलांन मोठ्या हिंमतीने घडवले.
स्नेहाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण खानापूर येथील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयात झाले. तिला लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते आणि ते स्वप्न खरं होण्यासाठी तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. तिच्या मेहनतीला फळ मिळाले.
एक शेतकऱ्याची लेक पोलीस उपनिरीक्षक बनली आहे.सातत्याच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.