---Advertisement---

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, काबाडकष्टानंतर शेतकरी कन्या बनली पोलिस उपनिरीक्षक !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील तिळवण येथील सोनाली सोनवणे ही कृषीकन्या. तिच्या घरची परिस्थिती बेताची, अतिशय प्रतिकूल परिस्थिती शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर आर्थिक ओढाताण करीत त्यांनी मुलां परिवहन खबरदार संसाराचा गाडा चालविण्यासाठी काबाडकष्ट केल. अशा परिस्थितीत लहानपणापासून जिद्दी व हुशार असलेल्या सोनालीने चिकाटी व बुद्धिमत्तेच्या बळावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

सोनालीचे वडील रमेश सोनावणे हे अल्पभूधारक शेतकरी. यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचा पाच मुली व दोन मुले असा मोठा परिवार आहे. त्यांनी शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर आर्थिक ओढाताण करीत त्यांनी मुलांचे शिक्षण व संसाराचा गाडा चालविण्यासाठी काबाडकष्ट केले.

---Advertisement---

अशा परिस्थितीत आपल्या मुलांनी शिकावे आणि मोठे व्हावे ही तिच्या वडिलांची इच्छा होती. सोनालीने दीड किलोमीटर पायी चालत गावातीलच शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले व दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून आपली चुणूक दाखवली. दहावीनंतर बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बारावीत उत्तम गुण मिळवून कॉम्पुटर सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.

पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात तर काहीना अनेक प्रयत्न करूनही यशाची पायरी सर करता येत नाही. त्यात घरची परिस्थिती बेताची असेल तर संघर्ष आणखी तीव्र बनतो. त्याप्रमाणे आईला कोरोना झाल्यामुळे पहिल्या प्रयत्नात फक्त दोन मार्काने यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.पहिल्याच परीक्षेत दोन मार्काने अपयश आल्याने मानसिक खच्चीकरण होत होते. पण कुटुंबाने तिला सांभाळून घेतले.

कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नाशिक येथे नोकरीला सुरुवात करत कामासह लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी परिवहन खबरदार लावता फक्त स्वयंअध्ययन आणि खासगी अभ्यासिकेत अभ्यास सुरू केला. तिने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात करून स्वबळावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts