⁠
Inspirational

आई-वडिलांनी शेती करुन घडवलं आणि लेकाने पीएसआय होऊन वर्दी मिळवली

MPSC PSI Success Story : घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना देखील शेतकऱ्याच्या मुलाने करून दाखवले. नीरा देवघर धरणग्रस्त असलेले व सध्या शेती करून उदरनिर्वाह करत असलेले योगेशचे वडील अनिल तान्हू धामुनसे यांचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत तर गृहिणी असलेली आई भिमाबाई अशिक्षीत आहेत. अशा ही परिस्थितीतील शेतीत काबाडकष्ट करुन आई वडिलांनी योगेशच्या शिक्षणासाठी पाठिंबा दिला.

भोर तालुक्यातील दुर्गम असलेल्या हिर्डोशी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील योगेश अनिल धामुनसे. त्याचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिर्डोशी येथे झाले. पाचवी पासून दहावीपर्यंतचे शिक्षण हिर्डोशी येथील समर्थ रामदास स्वामी विद्यालयात तर अकरावी-बारावी भोर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे झाले. अनंतराव थोपटे महाविद्यालयात कॉम्पुटर सायन्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले.

याच दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. यासाठी त्याने पुणे गाठले. खाजगी क्लासेस मध्ये शिकवणी घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह केला आणि अभ्यास करायला सुरुवात केली‌. याच मेहनतीला त्याला यश आले. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या हिमतीवर खडतर परिश्रमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यातच त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून ३३६ मार्क मिळवत ६४ रँकने उत्तीर्ण झाला. पोलिस उपनिरीक्षक हे पद मिळाले आहे.

Related Articles

Back to top button