⁠
Inspirational

स्वप्नांच्या मागे धडपडले तर यश मिळतेच ; पीएसआय रूबियाचा हा प्रेरणादायी प्रवास वाचाच…

MPSC PSI Success Stroy जिद्द असली तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश मिळवूनच दाखवतो. कधीकधी ठरवलेली गोष्ट होईलच असे नसते. तेव्हा खचून न जाता नव्याने कशाप्रकारे भरारी घ्यावी, हे रुबियाच्या प्रवासातून शिकायला मिळते. रुबिया जहीरा ताजुद्दीन मुलाणी ही मूळची सुभाषनगरची (ता. मिरज, जि. सांगली). रुबियाचे वडील ताजुद्दीन मुलाणी हे शिक्षक, तर आई गृहिणी. शिक्षणाचं बाळकडू घरातूनच मिळाल्यामुळे रुबियाला पहिल्यापासूनच शिक्षणाची गोडी निर्माण झाली. रुबियाचे एक काका आर्मीत सैनिक आहेत तर मोठा भाऊ बँकेत नोकरीला आहे.

तिने पदवी घेतल्यानंतर डी. एड.ला प्रवेश घेतला. त्यानंतर पदव्युत्तर पदवीही घेतली. कारण तिने वडिलांना लहानपणापासून शाळेत शिकवताना पाहिलं होतं. त्यामुळे तिने ठरवलं होतं की आपणही शिक्षक व्हायचं. परंतू, या दरम्यान शिक्षक भरतीच्या परीक्षा झाली नाही.रुबियानेही शिक्षिका होण्यासाठी ‘टीईटी’ परीक्षेची तयारी केली. परंतू, मधल्या काळात परीक्षा देखील रखडल्या होत्या. त्यामुळे शिक्षक भरतीही रखडली. पण ती निराश झाली नाही. आयुष्यात तिला पुढे जायचं होतं म्हणून तिने वेळ न घालवता पुणे गाठलं आणि स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. म्हणून तिने होत नसल्याने निराश झालेल्यान रुबियाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

पहिल्या परिक्षेत तिला अपयश आले पहिल्या प्रयत्नात खचून न जाता पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला आणि जोमाने तयारी केली. २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेत ती पास झाली आणि पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक पदावर तिची निवड झाली. मुलाणी परिवारातील ती पहिलीच पोलिस अधिकारी झालेली महिला आहे. एवढेच नव्हे तर तिने प्रशिक्षण घेत असताना बेस्ट कॅडेट इन ड्रीलचा किताबही पटकावला आहे.

Related Articles

Back to top button