MPSC मार्फत विविध रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : १७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक आयुक्त 
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, विज्ञान, कायदा, वाणिज्य, औषध किंवा अभियांत्रिकीची पदवी किंवा समकक्ष ०२) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

२) अधिष्ठाता 
शैक्षणिक पात्रता : ०१) वैधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा वैद्यकीय विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी अथवा वैधानिक भारतीय विद्यापीठाच्या एम.डी. किंवा एम.एस. पदवीच्या सामान असलेली ०२) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

अनुभव :
१. Have administrative, executive or supervisory experience in a responsible capacity for not less than five years in Government, Semi-Government or any big industrial or commercial concern.

२. The experience of ex-armed force officers will be considered as supervisory experience for the duration they served in the armed forces as commissioned officers.

३. The candidate should mention all details and submit evidence regarding administrative experience, supervisory experience or executive experience on the responsible post.

वयोमर्यादा : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते ५० [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय व अनाथ – ४४९/- रुपये]

वेतन श्रेणी : :
१) सहाय्यक आयुक्त : एम-३५ रुपये ६७,७०० ते २,०८,७०० + १५००/ विशेष भत्ता 
२) अधिष्ठाता :
स्तर १४ रुपये १,४४,२०० ते २,१८,२०० / अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जुलै २०२१

सहाय्यक आयुक्त पदासाठीची निवड प्रक्रिया :

-प्रस्तुत पदाच्या निवडीसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यांमध्ये भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. लेखी परीक्षेचा दिनांक यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल..

-लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे जाहिरातीतील विहित मूळ अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. ५.३ परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा योजना परीक्षेचे माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.

– परीक्षेचे स्वरुप : (१) परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असून २०० गुणांची व १ तास कालावधीची राहील.

-प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांमागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.

-परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारास किमान ३५% व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारास ३०% गुण मिळविणे आवश्यक राहील.

-दिव्यांगांकरीता २०% गुण मिळवणे आवश्यक राहील.

-मुलाखतीसाठी ५० गुण राहतील.

-अंतिम निवडीकरीता विचार होण्यासाठी उमेदवाराने मुलाखतीमध्ये किमान ४१% गुण मिळविणे आवश्यक (७) अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित असेल.

-प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरीता पात्र असणार नाही.

-सेवा भरतीबाबतची संपूर्ण प्रक्रिया सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ या पदाच्या (सेवा प्रवेश नियम), १९६५ आणि तद्नंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबवण्यात येईल.

-परिविक्षाधीन कालावधी ३ वर्षे राहील.

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

जाहिरात सहाय्यक आयुक्त (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

जाहिरात डीन (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment