MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 271 जागांसाठी भरती

Published On: मार्च 19, 2026
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 20 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आलीय.
एकूण रिक्त जागा : 271

पदाचे नाव & तपशील:

जा.  क्र. पद क्र.पदाचे नावपद संख्या
006/20261अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ244
007/20262मोटर वाहन अभियोक्ता, गट-अ06
008/20263जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ21
Total271

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) उच्च न्यायालय किंवा त्यास दुय्यम असलेल्या न्यायालयात, अधिवक्ता म्हणून काम केल्याचा आठ वर्षांचा अनुभव असावा.
पद क्र.2: (i) विधी पदवी (ii) राज्य किंवा भारतीय बार कौन्सिलने प्रदान केलेले ‘वकिली व्यवसायाचे प्रमाणपत्र’ (Certificate of Practice) प्राप्त केल्यानंतर, वकील म्हणून किमान सात वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असावा.
पद क्र.3: (i) जे केंद्रीय सशस्त्र दलांचे सेवारत सदस्य राहिलेले नाहीत आणि ज्यांनी लष्करामध्ये ‘मेजर’ किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पद, अथवा नौदल किंवा वायुदलामध्ये त्यास समतुल्य दर्जाचे पद धारण केले आहे;
(ii) ज्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आहे, ज्यामुळे त्यांना ही भाषा सहजपणे बोलता, वाचता आणि लिहिता येते; तथापि, जर आवश्यक दर्जाचा अधिकारी उपलब्ध नसेल, तर केंद्रीय सशस्त्र दलांचे सेवारत सदस्य राहिलेले नसलेले आणि ज्यांनी लष्करामध्ये ‘लेफ्टनंट’ किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पद, अथवा नौदल किंवा वायुदलामध्ये त्यास समतुल्य दर्जाचे पद धारण केले आहे, अशा अधिकाऱ्याचाही विचार केला जाऊ शकतो.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी, 18 ते 55 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

इतका पगार मिळेल?
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – 67,700/- ते 2,08,700/-
मोटर वाहन अभियोक्ता – 44,900/- 1,42,400/-
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक – 67,700/- ते 2,08,700/-
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 एप्रिल 2026
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/home

Important Links
जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now