⁠  ⁠

घरोघरी बांगड्या विकणाऱ्या कन्येच्या जिद्दीला सलाम ; चिकाटीच्या जोरावर बनली उपजिल्हाधिकारी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत अव्वल ठरलेली वसीमा शेख (Wasima Shaikh). महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षेत वसीमा महिलांच्या गटातून तिसरी आली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करून उपजिल्हाधिकारी ही बनली. वसीमाच्या घरी अभ्यासाचे मूळीच वातावरण नव्हते. तिचा जन्म आणि उर्वरित जडणघडण अत्यंत गरीब कुटुंबात झाली.

वडील देखील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात तर वसीमाची आई गावातल्या महिलांना घरोघरी बांगड्या ही विकते.वसीमाला शिक्षण पूर्ण करताना अनेक अडचणी समस्यांचा सामना करावा लागला. त्याच्या कुटुंबीयांनी अभ्यासाचा आग्रह हा धरला. यामुळेच तिने दोन वर्ष सातत्याने अभ्यास केला. साधारणपणे दररोज १५ ते १६ तास अभ्यास केला.

एखादी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी जेव्हा घरापासून दूर जाऊन पुण्यासारख्या शहरी ठिकाणी अभ्यास करायचा म्हणते, तर तिला विरोध केला जातो. पण तिच्या आई व भावाने तिला पूर्णपणे पाठिंबा दिला. खरंतर गावापासून महाविद्यालयात पायी चालत तिने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अभ्यास केला तर यश हमखास मिळेल हे तिला समजले होते. तिला याच मेहनतीवर २०१८ मध्ये STIची पोस्ट मिळाली तर दोन वर्षांनी उपजिल्हाधिकारी हे पद मिळाले. यावर वसीमा म्हणते की, ‘मैंने अपने आसपास, परिवार में और अपने इलाके में गरीबी और तकलीफ को बहुत पास से देखा है। एक तरफ सरकार और उसके साधन थे, दूसरी तरफ गरीब जनता। बीच में एक मीडिएटर की जरूरत थी, मैं वही मीडिएटर बनना चाहती हूं।

हेच माध्यम हजारो जणांना ताकद देणारे आहे. विद्यार्थी मित्रांनो, बहुतांशी विद्यार्थी परीक्षा जवळ आली की अभ्यासाला लागतात, पण असं केल्यानं स्पर्धा परीक्षा पास होता येत नाही. त्यासाठी अभ्यासात सातत्य लागते, संयम लागतो आणि हार्ड वर्क या तीन गोष्टींमुळे हे यश संपादन झाले आहे

Share This Article