---Advertisement---

पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन आई-वडिलांची केली स्वप्नपूर्ती ! तृप्तीचा हा प्रेरणादायी प्रवास वाचा..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : कोणत्याही परीक्षेत एका विशिष्ट पध्दती नुसार अभ्यास केला तर कोणतेही परीक्षा सहज उत्तीर्ण होता येते. हेच तृप्तीने दाखवून दिले आहे. तृप्ती ही जिद्दीने अभ्यास करून सरकारी अधिकारी झाली असून इतर मागास प्रवर्गात राज्यात महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

तृप्तीचे मूळ गाव बागलाण तालुक्यातील डोंगरेज आहे. लहानपणापासून अभ्यासाची व‌ विविध स्पर्धेची आवड असल्याने ही हुशारी शालेय जीवनापासून दिसून आली. तिचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या अभिनव बालविकास मंदिर शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण मविप्र संचलित मराठा हायस्कूलमध्ये प्रथम श्रेणीत पूर्ण केले.

बारावीनंतर अभियांत्रिकी (मॅकेनिकल) शाखेत प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण घेत असतानाच तृप्तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित केले. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी तिने सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला. त्यानंतर राज्यकर निरीक्षक परीक्षेत पूर्व व मुख्य परीक्षेत यश मिळवले.

तसेच २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात भूमी अभिलेख उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असली तरी तिच्या आई – वडिलांना नक्कीच खात्री होती की, आपली मुलगी सरकारी अधिकारी होईल. तसेच, तिने देखील हे स्वप्न पूर्ण केले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts