---Advertisement---

कोकणच्या सुपुत्राने MPSC परीक्षेत फडकवला झेंडा ; मेहनतीने झाला कृषी अधिकारी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : शेतीत काय दम नाही, हे वाक्य सर्रासपणे ऐकायला मिळते. पण याच शेतीच्या आवडीवर पदवी शिक्षण घेऊन अभिनव कृषी अधिकारी झाला. स्पर्धा परीक्षेत कोकण सुपूत्र असलेल्या अभिनव वैज याने यशाचा झेंडा फडकवला आहे.

अभिनवचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सावंतवाडी तालुक्यात कोलगाव येथे झाले. तिथल्याच कळसुकर इंग्लिश स्कूलमध्ये त्याचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याला लहानपणापासूनच अभ्यास करण्याची आवड आणि जिद्द असल्याने त्याला इयत्ता चौथी तसेच सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ही गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळाला होता. इयत्ता दहावी नंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ध्येय निश्चित केले.पण तयारी कशी करावी? कोणता क्लास लावायचा ह्याचे त्याला अजिबात मार्गदर्शन नव्हते. मग त्याने कृषी क्षेत्रातील पदवी घेतली.

त्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ साली झालेल्या वनविभागाची मुख्य परीक्षा तसेच कृषी सेवा मुलाखत दिली. मात्र तेव्हा निवड न झाल्याने पहिल्या प्रयत्नात अपयश आले. या अपयशाने खचून न जाता तसेच हार न मानता जिद्द बाळगून पुन्हा एकदा दररोज जवळपास आठ ते नऊ तास तो अभ्यास करायचा. याच जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राजपत्रित गट ब तालुका कृषी अधिकारी म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.

मित्रांनो, आपण स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहीले पाहिजे. यात अपयश झाले तरी त्यावर उपाय शोधून यशासाठी लढले पाहिजे. तळकोकणातील अभिनवला देखील सुरूवातीला कोणतेही मार्गदर्शन नव्हते पण त्याने कृषी अधिकारी होऊन परीक्षेत झेंडा फडकवला.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts